Tripti Dimri । अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या चर्चेत आहे. ॲनिमल या चित्रपटानंतर तृप्तीचे नशीब पूर्णपणे बदलले. तिचा नुकताच रिलीज झालेल्या बॅड न्यूज या चित्रपटालाही चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. नुकतीच ती बॉयफ्रेंडसोबत डिनर डेटसाठी जातांना दिसली. तृप्ती आणि सॅम नुकतेच एका रेस्टॉरंट बाहेर दिसले. यावेळी तृप्ती पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी पँटमध्ये नो मेकअप लुकमध्ये दिसून आली. या जोडप्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तृप्तीचा नो मेकअप लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. तर सॅम ग्रे रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसला. तृप्ती आणि सॅमच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होत्या. मात्र, अभिनेत्रीने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, तृप्तीला संदीप वंगा रेड्डी ॲनिमलमधून नाव-प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात तिची छोटी भूमिका होती, मात्र या छोट्याशा भूमिकेने ती प्रसिद्धीच्या झोतात आली. लोक तिला भाभी 2 म्हणू लागले. या अभिनेत्रीला नॅशनल क्रशचा टॅगही मिळाला आहे. या चित्रपटानंतर अभिनेत्रीला बॉलीवूडमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून मोठे चित्रपटही मिळू लागले. ॲनिमलमध्ये रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत होते. ॲनिमलच्या आधी बुलबुल आणि काला यांसारख्या चित्रपटात अभिनेत्री दिसली होती. या चित्रपटांचे समीक्षकांनी कौतुक केले. आता बॅड न्यूजनंतर ती विकी विद्याच्या व्हिडिओ, भूल भुलैया 3 आणि धडक 2 मध्ये दिसणार आहे.