पुष्पा 2 मधील ‘तृप्ती डिमरी’चे आयटम साँग झाले ‘कैंसल’

साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रुल’ हा चित्रपट सर्वाधिक चर्चेत आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाने थिएटरमध्ये चांगलीच खळबळ उडवून दिली होती, त्यासोबतच समंथा प्रभूच्या ‘ओ अंतवा’ या आयटम साँगने खूप प्रशंसा मिळवली होती.
चित्रपटाच्या हिट आयटम साँगनंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागातही धमाकेदार आयटम साँगची अपेक्षा लोकांना आहे. अशात तृप्ती डिमरी यात आयटम साँग करताना दिसणार असल्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती. पण आता या गाण्यासाठी तिला नकार देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी तृप्ती डिमरीचे ऑडिशन घेतले, परंतु तिला आता नकार देण्यात आला असल्याची चर्चा आहे. मात्र, नकाराचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही काळापूर्वी या चित्रपटाच्या आयटम साँगसाठी तृप्तीसोबत जान्हवी कपूरचेही नाव पुढे येत होते.
‘पुष्पा २: द रुल’ची लोक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. ‘पुष्पा’ चा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला होता. चित्रपटासोबतच त्याची गाणीही बरीच प्रसिद्ध झाली होती, ज्यापैकी चित्रपटातील सर्वाधिक आयटम साँग होते. या सिक्वेलमध्ये सामंथा प्रभू एक कॅमिओ करू शकते, परंतु अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. ‘पुष्पा २: द रुल’ ६ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना, फहाद फासिल, धनंजय, जगदीश प्रताप बंदरी, राव रमेश, अजय, सुनील, अनसूया भारद्वाज, षणमुख आणि अजय घोष यांच्या मुख्य भूमिका आहेत.
===============





