Trinamool Congress : बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू करू नये? तृणमूल कॉंग्रेसचा सवाल
पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) केला. तसेच, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली जाऊ नये, असा बोचरा सवाल करत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

Trinamool Congress : पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासळल्याचा आरोप तृणमूल कॉंग्रेसने (Trinamool Congress) केला. तसेच, बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट का लागू केली जाऊ नये, असा बोचरा सवाल करत अप्रत्यक्षपणे सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.
तृणमूलचे (Trinamool Congress) सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये कथितपणे तृणमूलच्या एका कार्यकर्त्यावर अज्ञात टोळके हल्ला करताना दिसते.
त्या व्हिडीओचा उल्लेख करून त्या पक्षाचे नेते डेरेक ओब्रायन यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांवर हल्ल्यांचे सत्र सुरू आहे. मात्र, पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बिघडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यात तसे चित्र असते; तर आतापर्यंत संबंधित राज्यात निश्चितपणे राष्ट्रपती राजवट लागू झाली असती, अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.
बंगालमध्ये काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये बाजी मारत भाजपने प्रथमच त्या राज्यात सरकार स्थापन केले. त्या सत्ताबदलानंतर आपल्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. तर, नेत्यांना (Trinamool Congress) पक्षाचे कार्यक्रम घेण्यापासून रोखले जात आहे, असा आरोप तृणमूलकडून सातत्याने केला जात आहे.






