“विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सुत्र, हिंदी ‘अनिवार्य’ शब्द कुठे?”; दादा भुसेंनी स्पष्ट केली भूमिका

Dada Bhuse | पहिलीपासून यंदा तिसरी भाषा शिकवली जाणार नाही आणि दोनच भाषा विद्यार्थ्यांना असतील,’ ही शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेली घोषणा फसवणूक ठरवणारा शासन निर्णय मंगळवारी रात्री उशिरा शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला. त्यानंतर राज्यभरातून मोठी टीका झाल्यानंतर आज सकाळी (१८ जून) शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
दरम्यान, राज्य सरकारने अलीकडेच पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर मराठी भाषा प्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला. नव्या आदेशानुसार, पहिलीपासून ते पाचवीपर्यंत हिंदी ही सर्वसाधारण तृतीय भाषा असणार आहे. तर हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्यासाठी किमान २० विद्यार्थी असणं अनिवार्य असणार आहे, असं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज स्पष्ट केले. Dada Bhuse |
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवली जाणार
“सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक असणार आहे. इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय आहे. तो बऱ्याच वर्षांपासून शिकविला जात आहे. इतर माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा, मराठी भाषा, इंग्रजी तिसरी भाषा असणार आहे. काल पहिली ते चौथीसाठी जो शासन आला आहे त्यात ‘अनिवार्य’ शब्द कुठे आहे? हिंदी विषय घ्यायचा का नाही हे विद्यार्थी ठरवतील. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार तिसरी भाषा शिकवली जाणार आहे. ते नियोजन करताना त्या वर्गातील किमान २० विद्यार्थ्यांनी मागणी केली तर शिक्षक उपलब्ध करून दिले जातील,” असे यावेळी दादा भुसे यांनी सांगितले.
“महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सुत्र राबविले जात आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी मेरीटमध्ये पुढे आले पाहिजे. संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, हाच हेतू आहे.दैनंदिन जीवनात हिंदी भाषेचा जास्त वापर होतो. भारतीय भाषेत जी मागणी हिंदी व्यतिरिक्त होईल, ती भाषा आम्ही देऊ. त्यामुळे पालकांच्या मागणीनुसार हिंदी विषय शिकविला जाणार आहे, शिक्षक संख्या कमी केली जाणार नाही. आता शिक्षक भरतीची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे,” असंही दादा भुसे म्हणाले. Dada Bhuse |
मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र
तसेच मराठी शिकवणं सुरु केलं नाही तर शाळांच्या मान्यता देखील रद्द केल्या जातील. गेल्या अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र वापरलं जातंय. मराठी ही भाषा होतीच, इंग्रजी आणि तिसरी भाषा आहे. इंग्रजीचे धोरण आपण आधीच स्वीकारले आहे. मुंबईत अनेक वर्षांपासून त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये, यासाठी त्रिभाषेचा अवलंब केला आहे. याशिवाय तिसऱ्या भाषेचा विषय विद्यार्थ्यांवर सोडला आहे,’ असे यावेळी दादा भुसे यांनी स्पष्ट केले आहे. Dada Bhuse |
हिंदी तृतीय भाषा असल्याचा शासन निर्णयात उल्लेख
दरम्यान, मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीसाठी हिंदी तृतीय भाषा असल्याचा उल्लेख शासन निर्णयात केला गेलाय. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी एक भाषा ही तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा असेल त्या विद्यार्थ्यांना ती भाषा निवडता येणार आहे. मात्र, शाळेमध्ये त्या तृतीय भाषेचा पर्याय घेताना किमान 20 विद्यार्थी एवढी पटसंख्या असावी, असे शासन निर्णयात नमूद केले आहे. Dada Bhuse |
हेही वाचा:





