Pune : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जेथे अठरा पगड जातीच्या स्त्रियांचा सन्मान केला त्या पाचाडच्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र समाधी स्थळी आज गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी मावळा जवान संघटनेच्या वतीने शेकडो महिलांना साडीचोळीची भाऊबीज भेट देऊन राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देण्यात आली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधी व परिसरात मावळा जवान संघटनेच्या वतीने भाऊबीजेच्या दिवशी आकर्षक फुलांची सजावट, रांगोळी काढली होती. शेकडो पणत्यांच्या दिपोत्सव परिसर उजळून निघाला होता. मावळा जवान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय महाराज तनपुरे व कार्यवाहक रोहित नलावडे यांच्या हस्ते पारंपरिक रिवाजात राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. हर हर महादेव,जय जिजाऊ, जय शिवराय च्या जयघोषाने , पारंपरिक लोकगीतांनी परिसर दुमदुमून गेला होता. पाचाड, रायगडवाडी, माणगाव, महाड, पोलादपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी ठिकाणच्या तिनशेहुन अधिक कष्टकरी महिलांचा साडीचोळीची भेट देण्यात आली. अनोख्या भाऊबीज भेटीने महिला भारावून गेल्या. जेष्ठ इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी आपल्या व्याख्यानानातुन राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी यांच्या मानवकल्याणकारी कार्य,महान त्याग, प्रखर राष्ट्रिय बाणा आणि विद्वत्तेचा महिमा सांगितला. मावळा जवान संघटनेचे प्रवक्ते तानाजी मरगळे यांनी जिजाऊ वंदनेने छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंच्या त्याग, स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जागा झाला. मरगळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज गोरगरीब कष्टकरी महिलांचा साडीचोळी देऊन सन्मान केला. हा मावळा जवान संघटनेने भाऊबीज सोहळ्याने जिवंत केला आहे.