स्वरभास्कराला मानवंदना.! मुंबईत होणार भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव

मुंबई – सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने विविध महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. येत्या २५ ते २७ एप्रिल २०२५ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई या ठिकाणी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार यांची असून, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी पहिल्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होणार आहे. तर याच दिवशी उस्ताद शाहिद परवेझ यांचाही शास्त्रीय गायनाचा कार्यकम होणार आहे.
शनिवारी दुसऱ्या पुष्पात सायंकाळी ६.०० वाजता डॉ. भरत बलवल्ली तसेच विदुषी मंजुषा पाटील यांचा शास्त्रीय गायनाचा कार्यकम होईल. रविवारी सायंकाळी ६.०० वाजता ज्येष्ठ गायक पं. आनंद भाटे आणि ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांचे शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.





