Kolhapur : कोल्हापुरात वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना अभिवादन
Kolhapur : या कार्यक्रमाला दैनिक प्रभातचे संदीप गिरगोसावी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

कोल्हापूर : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा वृत्तपत्र विक्रेता दिन आणि वाचक प्रेरणा दिन कोल्हापुरात उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भाऊसिंगजी रोड येथील वृत्तपत्र विक्रेता डेपोमध्ये डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते आणि कोल्हापूर महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवी लाड यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला दैनिक प्रभातचे संदीप गिरगोसावी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेत्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.





