“शेवटी ती आईच”! दिल्लीतील चेंगराचेंगरीनंतर चिमुरड्याला उराशी बांधून महिला पोलीस अधिकाऱ्याने बजावले कर्तव्य ; फोटो व्हायरल

Trending Photo RPF । असे म्हटले जाते की जगात आईसारखी ताकद कोणाकडेही नसते. जेवढी ती संवेदनशील असते तेवढीत ती कणखर देखील असते. सर्व प्रसंगांना धाडसाने तोंड देण्याचे सामर्थ्य एका आईमध्येच असते. हेच सिद्ध करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आरपीएफ कॉन्स्टेबल एकाच वेळी तिची दोन्ही कर्तव्ये पार पाडताना दिसत आहे. ही महिला कॉन्स्टेबल तिच्या मुलाला आपल्या उराशी बांधून नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर कर्तव्य बजावताना दिसत आहे.
रीना तिच्या १ वर्षाच्या मुलाला कडेवर घेऊन ड्युटीवर हजर
सोशल मीडियावरील एक फोटो सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत एका आईला योद्ध्याच्या रूपात पाहायला मिळत आहे. जी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर तिच्या लहान मुलाला छातीवर बांधून आणि हातात काठी घेऊन तिचे कर्तव्य बजावताना दिसत आहे. गेल्या शनिवारी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते, अशा वेळी हा फोटो व्हायरल झाला आहे. ही धाडसी आई केवळ तिच्या मुलांचेच नाही तर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांचेही रक्षण करत आहे.
एकाच वेळी दोन कर्तव्ये बजावत आहे Trending Photo RPF ।
या महिला कॉन्स्टेबलचे नाव रीना असल्याचे सांगितले जात आहे, तिला एक वर्षाचा मुलगा आहे आणि ती त्याला घरी कोणाच्याही देखरेखीखाली सोडू शकत नाही, म्हणून त्याला ड्युटीवर आणण्यास ती हतबल झाली. अशा परिस्थितीत सध्या रीनाचे एका हातात काठी धरलेले आणि दुसऱ्या हातात मुलाला हाताळतानाचे फोटो व्हायरल झाले तेव्हा लोकांनी तिचे भरभरून कौतुक केले. सध्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पोलिस बंदोबस्त कडक आहे.
युझर्सकडून रिनाचे कौतुक Trending Photo RPF ।
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच, वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला. एका वापरकर्त्याने लिहिले, “आई ही आई असते, तिला कोणीही हरवू शकत नाही.” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले… आईपेक्षा मोठा योद्धा कोणी नाही. भाग्यवान लोकांच्या डोक्यावर आईची सावली असते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… आज मला माझ्या आईची खूप आठवण येत आहे.





