पुणे | युनिक मेडिकल फाउंडेशनतर्फे वारकऱ्यांवर औषधोपचार

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – युनिक मेडिकल फाउंडेशन गेली १७ वर्षे वारकऱ्यांना पुणे आणि सासवड येथे मोफत औषधोपचार करत असून, जनवाडी येथील वीर बाजीप्रभू प्रशाला दिंडी क्र २४, गोखलेनगर येथील विठ्ठल सेवा मंडळ खेड बुद्रुक दिंडी क्र १००, कर्वेनगर येथील महालक्ष्मी मंदिर दिंडी क्र २८० व दत्तवाडी येथील त्रिमूर्ती निवास आणि सासवड येथील संत सोपानकाका समाधी मार्गावरील जगताप बंधू यांच्या येथे वारकऱ्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले.
यंदा १,७०० वारकऱ्यांना याचा लाभ मिळाला. याप्रसंगी १,२०० वारकऱ्यांना इंजेक्शन देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर लोखंडे, उपाध्यक्ष सुभेदार मोहन शेलार, कार्याध्यक्ष डॉ. राहुल लोखंडे, खजिनदार मानसी लोखंडे, सचिव नारायण फणसे, सहकार्याध्यक्ष डॉ. सुप्रिया लोखंडे, डॉ. दिनेश हेडगिरे, डॉ. गणेश खाडे,
डॉ. प्रतीक मेमाने, डॉ. माधवी लोखंडे, वैशाली खंडागळे, पद्मा रमपुरे, वासंती कोयाळीकर, अक्षय नागरगोजे, केदार गोंजारी, प्रशांत लोखंडे, संतोष परब, अण्णा भांडवलकर, संडे क्लबतर्फे सुनील भांडवलकर आणि त्यांची टीम, जयवंत कुंभार यांचे आयुष फार्मा, वीरपत्नी योगिता गिरीगोसावी यांचे कुणाल मेडिकल यांनीही सहकार्य केले.





