जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलावर ट्रेनची ट्रायल ठरली यशस्वी; पाहा व्हिडिओ

Chenab Rail Bridge| जम्मू-कश्मिरमध्ये चिनाब नदीच्या खोऱ्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. चिनाब नदीवर सुमारे 359 मीटर उंचीवर बांधलेला हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान असलेल्या या पुलावर रविवारी पहिली ट्रायल ट्रेन यशस्वीरीत्या धावली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. याचा व्हिडीओ देखील त्यांनी शेअर केला आहे.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “पहिली ट्रायल ट्रेन सांगलदान ते रियासीपर्यंत यशस्वीपणे धावली आहे, यावेळी चिनाब पूल ओलांडला आहे. USBRL चे सर्व बांधकाम जवळजवळ पूर्ण झाले आहे, फक्त बोगदा क्रमांक एक अंशतः अपूर्ण आहे.”
दरम्यान, उधमपुरा श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्प या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. 20 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. ट्रॅकवरील इलेक्ट्रिक इंजिनची यशस्वी चाचणी झाल्यानंतर सांगलदान ते रियासी दरम्यानच्या ट्रेनचे उद्घाटन 30 जून रोजी होण्याची शक्यता आहे. Chenab Bridge|
1st trial train between Sangaldan to Reasi. pic.twitter.com/nPozXzz8HM
— Ashwini Vaishnaw (@AshwiniVaishnaw) June 16, 2024
उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (USBRL) प्रकल्प 272 किमीचा आहे. तो 1997 मध्ये मंजूर झाला. 1997 मध्ये सुरू झाल्यापासून आतापर्यंत 209 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. रियासी आणि कटरा दरम्यानचे उर्वरित 17 किमी अंतर या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे, जे काश्मीरला उर्वरित क्षेत्राशी जोडले जाईल. Chenab Bridge|
किती आला खर्च ?
चिनाब रेल्वे पुलाच्या बांधकामात एकूण 30,000 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हा पूल 1486 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला आहे. ते ताशी 260 किमी वेगाने वाऱ्याचा सामना करू शकते. हा पूल उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे. Chenab Bridge|
हा पूल आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच
जम्मू आणि काश्मीरमध्ये बनवलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल चिनाब नदीच्या सुमारे 359 मीटर उंचीवर बांधला गेला आहे आणि आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच आहे. जम्मू-काश्मीर प्रशासन हा पूल पर्यटकांचे आकर्षण म्हणून विकसित करण्याचा विचार करत आहे.
हेही वाचा:
शरद पवारांचा छोट्या पक्षांवर विश्वास ; विधानसभा निवडणुकीची रंगत वाढणार





