Train Accident: महिन्याभरात चौथ्यांदा ट्रेन उलटवण्याचा कट, सिलिंडरनंतर आता पंजाबमध्ये रेल्वे रुळावर सापडल्या 9 लोखंडी सळ्या

चंदीगड: कानपूरनंतर आता पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र, लोको पायलटने वेळीच ट्रेनचे ब्रेक लावून हा कट उधळून लावला. पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात रेल्वे रुळांवर नऊ लोखंडी सळ्या आढळून आल्याने रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दिल्ली-भटिंडा मार्गावरील बांगी नगरजवळ सोमवारी (23 सप्टेंबर) या काठ्या आढळल्या आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, भटिंडाहून बीडब्ल्यूएल कोरी येथे जाणाऱ्या मालगाडीच्या लोको पायलटला ट्रॅकवर हे रॉड दिसले. यानंतर पॉइंट्समन आणि सहाय्यक स्टेशन मास्टरने सदर राॅड हटवले. या काळात रेल्वेचे मार्ग 40 मिनिटे खोळंबला होता. घटनास्थळावरून नऊ लोखंडी रॉड जप्त केले आहेत. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल करण्यात आहे. पंजाब जीआरपी या प्रकरणाचा तपास करत आहे.
कानपूरमध्ये रेल्वे रुळावर सापडला सिलेंडर –
या घटनेच्या एक दिवस आधी, रविवारी (22 सप्टेंबर) कानपूर जिल्ह्यातील महाराजपूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रेमपूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर गॅस सिलिंडर सापडला होता, त्यानंतर लोको पायलटने (ड्रायव्हर) मालगाडी थांबवली. मालगाडी कानपूरहून प्रयागराजच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रेन उलटवण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. याप्रकरणी सर्व बाजूंनी चौकशी सुरु आहे. भारतीय न्याय संहिता आणि रेल्वे कायद्याच्या कलम 287 (अग्नी किंवा ज्वलनशील पदार्थांच्या संबंधात निष्काळजीपणा), 125 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणारे कृत्य) अंतर्गत अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
सुमारे महिनाभरातील ही चौथी घटना असून, रेल्वे सेवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न झाला आहे. कानपूर घटनेच्या सुमारे 15 दिवसांपूर्वी शिवराजपूर परिसरात एलपीजी सिलिंडर रुळावर ठेवून प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसला रुळावरून उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गाडी थांबण्यापूर्वीच सिलिंडरला धडकली होती. ट्रेनची धडक बसल्याने सिलिंडर रुळावरून खाली फेकला गेला.
तसेच काही दिवसांपूर्वी कानपूर-कासगंज रेल्वे मार्गावर रुळांमध्ये गॅस सिलिंडर टाकून ट्रेन उलटविण्याचा प्रयत्न झाला होता. दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. सुमारे महिनाभरातील ही चौथी घटना आहे.




