भीषण अपघात ! खालून जाणाऱ्या रेल्वेवर बांधकामाची क्रेन कोसळली ; २२ जणांचा जागीच मृत्यू

Crane Collapse on Train। थायलंडमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. थायलंडची राजधानी बँकॉकच्या ईशान्येकडे जाणाऱ्या एका रेल्वेवर एक बांधकामाची क्रेन कोसळल्याची दुर्घटना घडली आहे.
क्रेन डब्यांवर कोसळल्याने ट्रेन रुळावरून घसरली. या भीषण अपघातात किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यासोबतच या अपघातात ७९ हून अधिक जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.
BREAKING: Deadly Crane Collapse Hits Passenger Train in Thailand:
Dozens of people were killed and injured after a construction crane lifting a section of a bridge collapsed onto a passenger train in Sikhio, Thailand, according to initial reports. pic.twitter.com/WstyygfZgU
— NOVEXA (@Novexa24) January 14, 2026
बँकॉकच्या ईशान्येला सुमारे २३० किलोमीटर अंतरावर असलेल्या नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात बुधवारी सकाळी हा अपघात झाला. ट्रेन उबोन रत्चाथानी प्रांताकडे जात होती. त्यात १९५ लोक होते. थायलंडचे उपपंतप्रधान आणि वाहतूक मंत्री फिफाट रत्चाकिप्रकर्ण यांनी अपघाताच्या कारणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. Crane Collapse on Train।
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रॅकच्या वरती हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू असताना क्रेन अचानक जाणाऱ्या ट्रेनवर कोसळली. क्रेन ट्रेनला धडकली, ज्यामुळे ती रुळावरून घसरली. यामुळे ट्रेनला आग लागली. आग विझवण्यात आली आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. Crane Collapse on Train।





