The Roshans Trailer : कुटुंबाच्या इतिहासाची कहाणी पाहिला मिळणाऱ्या ‘द रोशन्स’ माहितीपटाचा ट्रेलर रिलीज

रोशन कुटुबांची गोष्ट सांगणारा द रोशन्स या माहितीपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा माहितीपट नेटफिक्ल्स या ओटीटीवर १७ जानेवारी रोजी स्ट्रीम करण्यात येणार आहे. या माहितीपटामध्ये रोशन्स कुटुंबाची गोष्ट दाखविण्यात येणार असून सिनेमा क्षेत्रातील रोशन कुटुंबाचा तीन पिढ्यांचा इतिहास दाखविण्यात येणार आहे. शशी रंजन यांची सह निर्मिती दिग्दर्शन, राकेश रोशन यांची ही डॅाक्युमेंन्टरी मालिका आहे.
रोशन कुटुंबाच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार तसेच मिळालेले यश दाखवले जाणार आहे. रोशन कुटुंबातील सर्वात लोकप्रिय स्टार म्हणून हृतिक रोशनची ओळख आहे. त्याने चाहत्यांच्या मनात स्वःताचे अढळ स्थान निर्माण केले आहे. या ट्रेलरची सुरुवातच हृतिक रोशनने होते. या ट्रेलरमध्ये तो त्याच्या कुटुंबाची कहाणी सांगताना दिसतो आहे. या माहितीपटाच्या सिरीजचा ट्रेलर नागरथ यांनी संगीतबद्ध केला असून सर्वात्तम क्लासिक गाण्यांनी तो सुरू होतो.
हृतिकचे काका राजेश रोशन हे हिंदी सिनेमा सृष्टीमधील एक उत्तम संगीत दिग्दर्शक देखील आहेत. अशाप्रकारे रोशन लाल नागरथच्या कुटुंबात असे एक ना अनेक कलाकार मंडळी आहेत. ज्यांनी कला क्षेत्रात मोठं योगदान दिलं आहे. हाच प्रवास द रोशन्स या माहितीपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





