Daku Maharaj : आता ‘डाकू महाराज’ चित्रपटाचा आनंद घरी बसून घ्या! जाणून घ्या, कधी आणि कोणत्या OTT वर पाहता येणार

साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय चित्रपट ‘डाकू महाराज’ आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ‘दबिडी-डिबिडी’ या गाण्यामुळे हा चित्रपट जास्त चर्चेत आला होता. डाकू महाराज हा तेलुगू चित्रपट असून 12 जानेवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.
डाकू महाराज हा चित्रपट 2025 चा तिसरा-सर्वाधिक कमाई करणारा तेलगू चित्रपट ठरला आहे. आता प्रेक्षकांना चित्रपटगृहानंतर OTT वर हा चित्रपट पाहता येणार आहे.ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या पेजवर या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत अपडेट देण्यात आली आहे. नंदामुरी बालकृष्ण यांची प्रमुख भूमिका असलेला डाकू महाराज हा चित्रपट २१ फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात ६४ वर्षीय नंदामुरी बालकृष्ण, बॉबी देओल आणि उर्वशी रौतेला यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तेलगू रिलीजनंतर हा चित्रपट 24 जानेवारीला हिंदी व्हर्जनमध्ये रिलीज करण्यात आला होता. हिंदी रिलीजबद्दल, नंदामुरी बालकृष्ण म्हणाले, “चाहत्यांचे प्रेम आणि प्रतिसाद खरोखरच चांगला आहे. डाकू महाराज हा माझ्या हृदयाच्या खूप जवळचा चित्रपट आहे आणि तो आता भारतभरातील हिंदी प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय याचा मला आनंद आहे, असे म्हटले होते.
‘डाकू महाराज’ चित्रपटाचे संगीतही रसिकांना खूप भावले आहे. उर्वशी रौतेला आणि नंदामुरी बालकृष्ण यांच्यासोबत चित्रित केलेले ‘दबिडी-डिबिडी’ या गाण्यावर ट्रोलिंग करण्यात येत होते. नंदामुरी यांच्यावरही नेटकऱ्यांनी टीका केली होती. हे गाणे थमन यांनी संगीतबद्ध केले आहे.





