TRAI New Rules: तुम्ही जर दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता दोन्ही सिम कार्ड सुरू ठेवण्यासाठी वारंवार रिचार्ज करण्याची गरज नाही. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) सिम कार्डशी संबंधित नवीन नियम लागू केला आहे. या नियमामुळे आता Jio, Airtel, Vi आणि BSNL यूजर्सला रिचार्ज न करताही जास्त दिवस सिम सुरू ठेवता येणार आहे. यापूर्वी रिचार्ज न केल्यास कंपन्यांकडून काही दिवसातच सिम कार्ड बंद केले जात असे. मात्र, आता नवीन नियमाचा यूजर्सला फायदा होणार आहे. 120 दिवस सुरू राहणार सिम कार्ड दोन सिम कार्ड वापरत असल्यामुळे यूजर्सला रिचार्ज करणे शक्य होत नाही. त्यामुळे कंपन्यांकडून सिम कार्ड बंद केले जात असे. मात्र, आता रिचार्ज संपल्यानंतरही 90 दिवस म्हणजेच जवळपास 3 महिने सिम कार्ड सुरू राहील. याशिवाय, यूजर्सच्या सिम कार्डमध्ये प्रीपेड बॅलेन्स असल्यास 20 रुपये अतिरिक्त देऊन वैधता आणखीन 20 दिवसांसाठी वाढवता येईल. 90 दिवसानंतर प्रीपेड बॅलेन्समधून 20 रुपये कापले जातील व यूजर्सला अतिरिक्त 30 दिवसांची मुदत मिळेल. अशाप्रकारे, सिम कार्ड जवळपास 120 दिवस सुरू राहील. एवढेच नाही तर 120 दिवसांनंतरही सिम सुरू ठेवण्यासाठी यूजर्सला 15 दिवसांची मूदत दिली जाईल. रिपोर्टनुसार, जिओ यूजर्सचे सिम कार्ड कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवस सुरू राहील. त्यानंतर पुन्हा रिचार्ज करावे लागेल. अन्यथा तुमचा नंबर कायमचा बंद होईल. एअरटेल यूजर्स देखील कोणत्याही रिचार्जशिवाय 90 दिवस नंबर वापरू शकतील व त्यानंतर रिचार्जसाठी 15 दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाईल. व्हीआय यूजर्सला 90 दिवसांनंतर सिम सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी 49 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. तर बीएसएनएल यूजर्सचे सिम कार्ड कोणत्याही रिचार्ज शिवाय 180 दिवसांपर्यंत सुरू राहील.