Maratha Reservation : दुःखद घटना! जरांगेंच्या उपोषणापूर्वी मराठा तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू; सर्वत्र हळहळ व्यक्त

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावाली सराटी येधून थेट मुंबईच्या दिशेने आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह कूच केली आहे. आज सकाळी मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्ह्यात दाखल झाले.
त्यांनी किल्ले शिवनेरीवर जात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. यानंतर आता ते पुढे मार्गस्थ झाले आहेत. मात्र, त्यांच्या या प्रवास दरम्यान एक दुःखद घटना घडली आहे.
जुन्नरजवळ एका मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. सतीश देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. उद्या २९ अॅागस्टला मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वीच ही दुर्घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जरागे वेळ पाळणार का?
जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 8 तासांची वेळ देण्यात आली आहे. यावरून जरांगेंनी चेष्टा केल्याचं विधान केलं आहे. या आंदोलनसाठी सरकारने घालून दिलेल्या अटीशर्तींवरही जरागेंनी बोट ठेवलं असून अटीशर्ती काढा अशी मागणी केली आहे. यामुळे आता जरांगेंंना घालून दिलेली आंदोलनाची वेळ ते पाळणार का? या विषयी काय भूमिका घेणार? हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे.
हेही वाचा : “भारतावर अणुबॉम्ब टाका अन्…” ; अमेरिकन शाळेतील हल्लेखोराच्या बंदुकीवर धक्कादायक मजकूर, ट्रम्पचाही उल्लेख




