डोणजे मुख्य चौकात अरूंद रस्त्यामुळे वाहतुक कोंडी; रस्ता रुंदीकरणाची मागणी

Updated On:

खडकवासला – पर्यटकांसाठी जवळचे पुणे शहराजवळील ऐतिहासिक किल्ले सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या  डोणजे गावातील मुख्य चौकात अरूंद रस्त्यामुळे  वाहतुक कोंडी होत असून चौकातील रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी खडकवासला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी केली आहे.

एका दिवसात पर्यटन  करता येणारे पुणे शहराजवळील किल्ले सिंहगडावर  येणाऱ्या पर्यटकांची आणि पुणेकरांची  संख्या सध्या वाढती आहे. सिंहगड   रस्त्यावरून पुढे पानशेत पर्यंत  तीस-पस्तीस गावातील  गावकऱ्यांची आणि ग्रामस्थांची शहराकडे येणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. डोणजे चौक डोणजे आणि गोऱ्हे  बुद्रुक या दोन गावांच्या बरोबर मध्ये आहे.

येथून होणारी वाहतूक ही सर्व प्रकारची जड आणि हलकी अशी आहे. शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटकांमुळे अनेकदा हा चौक रहदारीने तुंबलेला असतो. अशा चौकाचे वाहतूक सुविधांनी युक्त असे रुंदीकरण होण्याची नितांत गरज आहे. प्रशासनाने परिसराची आणि चौकाचे पाहणी करून त्वरित निर्णय घेऊन रुंदीकरण करावे तसेच सिंहगडाकडे जाणाऱ्या पर्यायी रस्त्याचे काम झाल्यास गावातील मध्यातून  जाणार्‍या रस्त्यावरील ताण कमी होईल आणि पर्यटकांची अडचण होणार नाही.

आणखी संबंधित बातम्या

Pavana Dam: नदीकाठी न जाण्याचा इशारा, तरी जीव धोक्यात घाऊन धुतली जातायत कपडे

2026-08-05 08:02:01

Pavana Dam: नदीकाठी न जाण्याचा इशारा, तरी जीव धोक्यात घाऊन धुतली जातायत कपडे

Traffic Jam : वाहनचालक रोज अडकताहेत कोंडीत

2026-07-29 08:20:59

Traffic Jam : वाहनचालक रोज अडकताहेत कोंडीत

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत १७ टीएमसी पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी?

2026-07-14 15:02:20

Khadakwasla Dam : खडकवासला धरणसाखळीत १७ टीएमसी पाणीसाठा असताना पाणीकपात कशासाठी?

Ektanagari : एकतानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; क्षेत्रीय कार्यालयाकडून दूर्लक्ष

2026-07-07 14:23:29

Ektanagari : एकतानगरीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था; क्षेत्रीय कार्यालयाकडून दूर्लक्ष

Rahul Kul: पुणे-दौंड रेल्वे मार्गाला 'उपनगरीय' दर्जा द्या; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत आग्रही मागणी

2026-06-26 04:30:03

Rahul Kul: पुणे-दौंड रेल्वे मार्गाला 'उपनगरीय' दर्जा द्या; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत आग्रही मागणी