Pune District : रस्त्यावर दुभाजक टाकल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी
रPune District : स्ता बंद केल्यामुळे आणि पादचाऱ्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. यामुळे येथे अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.

चिंबळी : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील कुरूळी-चिंबळी (बर्गे वस्ती) येथील बस स्टॉपजवळ प्रशासनाने अचानक दुभाजक (डिव्हायडर) टाकून रस्ता बंद केला आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक आणि शालेय विद्यार्थी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या बदलामुळे चाकण ते भोसरी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बर्गे वस्ती बस स्टॉप परिसरात अनेक लहान-मोठे हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार आहेत. दुभाजकामुळे रस्ता ओलांडण्याचा मार्ग अचानक बंद झाल्याने ग्राहकांनी या दुकानांकडे पाठ फिरवली आहे, ज्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी किंवा वाहने वळवण्यासाठी (यू-टर्न) आता थेट चाकण किंवा मोशीच्या दिशेने दूरपर्यंत फेरा मारावा लागत आहे.
या भागातील शाळा आणि महाविद्यालयांत जाणारे शेकडो विद्यार्थी याच बस स्टॉपचा वापर करतात. रस्ता बंद केल्यामुळे आणि पादचाऱ्यांसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था न केल्याने विद्यार्थ्यांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. यामुळे येथे अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे.





