हडपसर : वारंवार होणाऱ्या वाहतुकीतील बदलांमुळे हडपसरमधील अनेक वाहनचालक गोंधळात पडले आहेत. विशेषत: मगरपट्टा चौकातील वाहतूक व्यवस्था बदलण्यात आली आहे, ज्यामुळे वाहनचालकांना रस्ता शोधण्यात त्रास होत आहे आणि वाहतूक कोंडी देखील वाढत आहे. पुणे -सोलापूर महामार्गवरती हडपसर मगरपट्टा चौकातील उड्डाणपूला खालून मगरपट्टा तसेच मुंढवा, खराडीकडे जाण्यासाठी पुलाखालून टर्न होता. तो काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आला आहे. हडपसरकडून मगरपट्टा उड्डाणपलावरून जाऊन मगरपट्टा मुंढव्याकडे वळण करण्याच्या म्हणजेच मगरपट्टा उड्डाणपूल वापरण्यात सांगितले. तर हडपसरमधून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पुलाच्या बाजूला असलेल्या पुणे -सोलापूर महामार्गावरून सरळ जाण्यास सांगितले. दरम्यान, हडपसर मगरपट्टा उड्डाणखाली पुलाच्या खालील एका भागात दुभाजक तोडून पंक्चर करून यु टर्न देण्यात आला होता. तोही आठवडाभरात बंद करण्यात आला. आता रामटेकडी हडपसर वाहतूक पोलीस चौकी समोरील सिग्नल येथून यु टर्न घ्यावा किंवा ज्यांना पुन्हा मेगासेंटर किंवा हडपसरकडे यायचे असेल, त्यांनी या ठिकाणाहून यु टर्न घ्यावा असे नियोजन करण्यात आले आहे. सूचना योग्य त्या ठिकाणी लावण्यात पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर मगरपट्टा चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक विभागाकडून वारंवार होणाऱ्या या बदलामुळे वाहन चालक संभ्रमात पडत असून अचानक होणारे या बदलामुळे वाहन चालकांचा गोंधळ उडत आहे. वाहतुकीतील होणाऱ्या बदलाच्या व वाहतूक सुरळीत राहण्यासाठीच्या आवश्यक असणाऱ्या सूचना योग्य त्या ठिकाणी लावण्यात याव्यात, अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे. हडपसर मगरपट्टा चौकातील उड्डाणपुलाचा योग्य वापर केलास वाहतूक कोंडी टाळणार आहे. त्या संदर्भातील सूचना फलक ही ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत. तरीही आवश्यक असल्यास पुन्हा एक वेळ सूचनाफलक लावले जातील. नागरिकांनीही योग्य ठिकाणावरून आपला प्रवास करावा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे , हडपसर वाहतूक पोलीस स्टेशन