छगन भुजबळांच्या नावावर ट्रॅक्टर तर बायकोच्या नावावर पिकअप, महागड्या गाड्या कोणाच्या नावावर?

Chhagan Bhujbal । नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून मंत्री छगन भुजबळ विधानसभेची निवडणूक लढवत आहे. त्यांनी नुकताच उमेदवारी अर्ज दाखल केला. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली आहे. त्यानुसार, त्यांच्याकडे ट्रॅक्टर, पिकअप, स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावे 16 कोटींची मालमत्ता आहे. या प्रतिज्ञापत्रानुसार छगन भुजबळ यांच्याकडे किती आहे संपत्ती?
Chhagan Bhujbal । छगन भुजबळ एकूण संपत्ती ?
– मंत्री छगन भुजबळ यांच्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता 16 कोटी 53 लाख रुपये आहे.
-मीना भुजबळ यांच्या नावे 2 कोटी 38 लाख 29 हजार 52 रुपयांची जंगम तर 86 लाख 21 हजार 572 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
-त्यांच्या नावावर 21 लाख 10 हजार 250 रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे 32 लाख 76 हजार रुपयांचे 455 ग्रॅम सोने, 4 लाख 37 हजारांची 5,150 ग्रॅम चांदी तर 22 लाख 5 हजारांच्या इतर मौल्यवान वस्तू आहेत.
-मीना भुजबळ यांच्या नावावर एक पिकअप वाहन आहे.
– छगन भुजबळ यांच्याकडे एकूण 11 कोटी 20 लाख 41 हजार रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्यावर 24 लाख 56 हजारांचे कर्ज आहे.
-भुजबळ यांच्या नावे दोन ठिकाणी शेतजमीन, दोन घरं आहेत. 3 लाख रुपये त्यांनी न्यायालयात अनामत रक्कम म्हणून भरले आहेत.
– भुजबळ यांच्याकडे 585 ग्रॅम सोनं आहे. त्यांच्या नावावर एक ट्रॅक्टर आहे.
गेल्या पाच वर्षांत किती झाली वाढ
गेल्या पाच वर्षांत 2019 नंतर छगन भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची वाढ दिसून आली. भुजबळ यांच्याकडे 11 कोटी 20 लाख 41 हजारांची मालमत्ता आहे. तर पत्नीच्या नावावर 16 कोटी 53 लाखांची मालमत्ता आहे. मागील पाच वर्षांत भुजबळ यांच्या मालमत्तेत 82 लाखांची भर पडली तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीत 3 कोटी 35 लाख रुपयांची भर पडली.





