IND vs BAN : तौहिद हृदोयची शतकी खेळी; बांगलादेशचे टीम इंडियासमोर ‘इतक्या’ धावांचे आव्हान

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात अवघ्या ३५ धावांवर पाच विकेट तंबूत होते. पण सहाव्या विकेटसाठी तोहिद हृदोय आणि जाकेर अली यांनी १५४ धावांची भागीदारी केली संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. बांगलादेशने ४९. ४ ओव्हरमध्ये २२८ धावा केल्या.
या सामन्यात यावेळी बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली. सामन्याच्या पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने सौम्य सरकारला शुन्य धावांवर यष्टीरक्षक केएल राहुलकडून झेलबाद केले.त्यानंतर पुढच्याच षटकात हर्षित राणाने कर्णधार नजमुल हुसेन शांतोला शुन्य धावांवर विराट कोहलीच्या हातात कॅच देऊन झेलबाद केले. शांतो बाद झाला तेव्हा धावसंख्या 2 बाद 27 धावा होती. यानंतर अक्षर पटेल आणि शमीने भेदक गोलंदाजी करत बांगलादेशची अवस्था ३५ वर ५ विकेट अशी केली.
भारतासमोर २२९ धावांचे आव्हान
या सामन्यात भारताकडून मोहम्मद शमीने ५ विकेट, हर्षित राणाने ३ विकेट्स, अक्षर पटेलने २ विकेट्स, घेतल्या. या सामन्यात मोहम्मद शमी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. मोहम्मद शमीने ५१२६ चेंडूत २०० विकेटचा पल्ला गाठला आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव.
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहिदी हसन मिराझ, जाकेर अली, रिशाद हुसेन, तंजीम हसन साकिब, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान.





