नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी धावले एकनाथ शिंदे; फोनवरुन साधला संवाद

Eknath Shinde | नेपाळमधील Gen-Z च्या आंदोलनामुळे तीव्र अशांतता निर्माण झाली आहे. त्यातच पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय उलथापालथ झाली आहे. या गोंधळात ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व कल्याण तालुक्यातील अनेक नागरिक पर्यटनासाठी नेपाळमध्ये गेले असता काठमांडू आणि पोखरा येथे अडकले आहेत. यामुळे
महाराष्ट्रातील तब्बल १५० पर्यटक संकटात सापडले आहेत. या पर्यटकांनी आता भारताकडे मदतीची मागणी केली आहे. याचदरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसोबत फोनवरून संवाद साधला आहे.
View this post on Instagram
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री काही पर्यटकांशी मोबाइलवरून संवाद साधत राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने तुम्हाला सुखरूप महाराष्ट्रात परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, काळजी करू नका, अशी ग्वाही त्यांनी पर्यटकांना दिली आहे. याशिवाय आमदार किसन कथोरे यांनी देखील काठमांडूत अडकलेल्या नागरिकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला.
आमदार किसन कथोरे यांनीही साधला संवाद
नेपाळच्या काठमांडू परिसरात मुरबाड तालुक्यातील तब्बल ४७ पर्यटक गेल्या सात दिवसांपासून अडकले आहेत, तर पोखरा परिसरात ६५ पर्यटक अडकलेले आहेत. यापैकी काहींना विशेष विमानाने तर काहींना रस्ते मार्गाने भारतात आणण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असून, लवकरच पर्यटकांना परत आणले जाईल, असे कथोरे यांनी स्पष्ट केले आहे. Eknath Shinde |
दरम्यान, नेपालमध्ये सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातल्यानंतर 8 सप्टेंबर रोजी जेन-झेडच्या नेतृत्वाखालील निदर्शनांमध्ये मृतांची संख्या वाढून 30 झाली आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. Eknath Shinde |
हेही वाचा:
“सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’; भारत-पाकिस्तान मॅचविरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर





