Weather Update | राज्यातील काही भागात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. तर आजही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर आज पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण तयार झाले असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर आज मुंबई पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पावसाचे अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील चार दिवस पावसाची शक्यता रविवारपासून (ता.२६ ऑक्टोंबर) ते १ नोव्हेंबर पर्यंत हिंदी महासागर, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होणार आहे. त्यामुळे चक्राकार वादळी वारे भारताचे पूर्व, पश्चिम व दक्षिण भागातून मोठ्या प्रमाणावर ढगांचे स्वरूपात बाष्प आणतील. त्यातून तमिळनाडू, आंध्रप्रदेश कर्नाटकसह महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात जेथे हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होईल तिथे विजांसह पावसाची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. Weather Update | आज कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी ? या पार्श्वभूमीवर 26 ऑक्टोबर रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर ,परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात विजांसह गडगडाटी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather Update | हेही वाचा : पंकजा मुंडेंनी घेतली डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांची भेट; न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी