Vijay Wadettiwar : “कर्जाचा डोंगर, घरात धान्याचा एक दाणाही नसताना सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार?” विजय वडेट्टीवारांचा सवाल
Vijay Wadettiwar : "कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासाठीचा अनावश्यक खर्च थांबवा आणि शेतकऱ्यांना मदत करा"

Vijay Wadettiwar : राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून सरकारकडून ५ हजार रूपये दिले जाणार आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत दुष्काळाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या ५ हजार रुपये प्रति शेतकरी आग्रीम मदतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ अकाउंटवर पोस्ट करत लिहिले की, “शेतकऱ्यांच्या तोंडाला ५ हजारांची पाने पुसू नका. राज्यातील शेतकरी पुढचं वर्ष कसं जगायचं, या चिंतेत आहे. कर्ज काढून शेती केली, सावकारी आणि खासगी कर्जाचा डोंगर उभा राहिला, पण घरात धान्याचा एक दाणाही आला नाही. अशा परिस्थितीत सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार?”
शेतकऱ्यांच्या तोंडाला ५ हजारांची पाने पुसू नका!
राज्यातील शेतकरी पुढचं वर्ष कसं जगायचं, या चिंतेत आहे. कर्ज काढून शेती केली, सावकारी आणि खासगी कर्जाचा डोंगर उभा राहिला, पण घरात धान्याचा एक दाणाही आला नाही. अशा परिस्थितीत सरकारची ५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या कोणत्या अडचणी सोडवणार?
शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासाठी सव्वा लाख कोटींच्या खर्चाचे नियोजन सुरू आहे. अनावश्यक खर्च थांबवा आणि शेतकऱ्यांना मदत करा!
कुंभमेळ्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळवा. ५ हजार देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे!
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@SunetraA_Pawar
@mieknathshinde
@bharanemamaNCP#MaharashtraDrought #farmercrisis #farmerslife
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) October 14, 2026
‘५ हजार देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले’
तसेच सध्या कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासाठी केल्या जात असलेल्या खर्चावरूनही वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण कुंभमेळा आणि शक्तिपीठ महामार्गासाठी सव्वा लाख कोटींच्या खर्चाचे नियोजन सुरू आहे.
अनावश्यक खर्च थांबवा आणि शेतकऱ्यांना मदत करा. कुंभमेळ्यापेक्षा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळवा. ५ हजार देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे.
हेही वाचा:





