Nana Patekar : करारी अभिनेता आपण गमावला ! नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आशिष शेलार यांच्याकडून दु:ख व्यक्त
Nana Patekar: 'मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला'

Nana Patekar Passes Away : मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं आज आकस्मिक निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पावला येथील घरी हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी तातडीने मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र उपचारांदरम्यान पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
नाना पाटेकर यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सर्वांच मोठा धक्का बसला आहे. सिनेसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनीही नाना पाटेकर यांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त केले आहे. आशिष शेलार यांनी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत ‘करारी अभिनेता आपण गमावला’ असल्याचे म्हंटले आहे.
“मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे,” असे म्हणत आशिष शेलार यांनी शोक व्यक्त केला आहे.
करारी अभिनेता आपण गमावला !
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या अभिनयाने अजरामर ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
आपल्या दमदार अभिनयाने अनेक भूमिका जिवंत करणाऱ्या नानांनी रंगभूमी, चित्रपट आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीने एक संवेदनशील, करारी, प्रतिभावान आणि अस्सल कलावंत गमावला आहे. महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे.
नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.ॐ शांती! 🙏
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 8, 2026
पुढे त्यांनी लिहिले, “महाराष्ट्र शासनानाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ पुरस्कारासह चित्रपट क्षेत्रातील अनेक पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे आलेल्या नाना पाटेकर यांनी अपार मेहनत व आपल्या वेगळ्या शैलीने अभिनयात ठसा उमटवला. आमच्या गिरणगावातील एक अस्सल, इरसाल, उत्सव प्रेमी मराठी माणूस आम्ही आज गमावला आहे.नाना पाटेकर यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो. त्यांच्या असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.ॐ शांती!”
नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य
नाना पाटेकर यांनी अभिनयासोबत सामाजिक क्षेत्रामध्येही आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सामाजिक कार्य सुरू केले होते. सिनेसृष्टीसह राजकीय नेतेमंडळींसोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने सिनेसृष्टीसह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.
Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक





