Vinod Kambli: विनोद कांबळीच्या तब्येतीची अपडेट समोर; ब्रेन स्ट्रोकचा धोका, मित्रांनी दिला मदतीचा हात
Vinod Kambli: विनोद कांबळीची स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणावर खालावली

Vinod Kambli: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी गंभीर आजाराशी झुंज देत आहे. त्याच्या मेंदूत रक्ताची गाठी आढळल्या असून ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. मागच्या वर्षी विनोद कांबळीवर ठाण्याच्या एका रुग्णालयात युरिनरी इनफेक्शनवर उपचार केले होते.
कांबळीचा जवळचा मित्र, मार्कस कुटो याने एका मुलाखतीत विनोद कांबळीच्या सध्याच्या प्रकृतीबद्दल खुलासा केला आहे. कांबळी आता चालू शकत आहे, पण त्याची स्मरणशक्ती मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, पण अजूनही पूर्णपणे धोका टळलेला नाही.
कांबळीने मद्यपान सोडलं आहे, पण त्याच्या ढासळत्या मानसिक स्थितीमुळे तो कधीकधी धूम्रपान न करण्याचं विसरतो. तसंच आता त्याला ब्रेन स्ट्रोकचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
मार्क्स कूटो याने असेही सांगितलं की, ‘मी जुन्या मित्रांचा व्हॉट्सग्रुप तयार केला आहे. यात बहुतेक माजी क्रिकेटपटू आहे. ते नाव न जाहीर करता आर्थिक मदत करत असतात. विनोदची स्मरणशक्ती कमकुवत आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
विनोदला फार काही आठवत नाही. एखादी जुनी गोष्ट आठवण्यासाठी बराच वेळ लागतो. त्याच्या मेंदूत रक्ती गाठी आहेत. त्यामुळे त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका देखील डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. तो इच्छाशक्तीच्या बळावर उपचारांना प्रतिसाद देत आहे’. Vinod Kambli
विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का
प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरण सोहळ्यासाठी विनोद कांबळी आला होता, तेव्हा विनोद कांबळीची अवस्था पाहून अनेकांना धक्का बसला. आपला मित्र सचिन तेंडुलकरचा हात धरून विनोद कांबळी लडखडताना दिसला, ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला.
यानंतर, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज सुनील गावस्कर, कपिल देव आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी कांबळीला आर्थिक पाठिंबा दिला. कांबळीच्या जुन्या मित्रांनी आर्थिक मदतीसाठी केलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सचिन तेंडुलकर देखील आहे.
हेही वाचा:






