Donald Trump on Netanyahu: “नेतान्याहू माझ्याच इशाऱ्यावर चालणार..”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्याने जगभरात खळबळ
Donald Trump on Netanyahu: आखाती देशातील युद्ध संपण्याची कोणतीही दिसत नाहीत. तर दुसरीकडे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे

Donald Trump on Netanyahu: आखाती देशातील युद्ध संपण्याची कोणतीही दिसत नाहीत. तर दुसरीकडे आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या दाव्याने जगभरात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांनी, “ते इस्रायलमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवू शकतात” असे मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने नव्या चर्चेला उधाण आले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे मी सांगेन ते करतील, असेही ट्रम्प म्हणाले आहेत. नेतान्याहू खूप चांगले आहेत. मी त्यांना जे करायला सांगेन, तेच ते करतील. माझ्या मते, इस्रायलमध्ये त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. सध्या इस्रायलमध्ये माझी लोकप्रियता ९९% आहे. मी पंतप्रधानपदासाठी निवडणूक लढवू शकतो. असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांच्या या खोचक वक्तव्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकच गोंधळ उडाला आहे. (Donald Trump on Netanyahu)

दरम्यान, इराणविरुद्ध लष्करी कारवाई पुन्हा सुरू करण्याची तयारी असल्याचेही ट्रम्प यांनी सांगितले. इराणविरोधातील वाढणाऱ्या तणावाबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, करार करण्यासाठी कोणतीही घाई नाही. त्यांना आणखी एक संधी देऊ, पण मला घाई नाही. जीवितहानी कमीत कमी करणे हे माझे ध्येय आहे. दरम्यान, जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर आणखी एक मोठा हल्ला होऊ शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी इराणला दिला होता. (Donald Trump on Netanyahu)
इराणचे हवाई दल आणि नौदल पूर्णपणे उद्ध्वस्त केल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला चालू संघर्षात स्वतःलाच खूप मोठा फटका बसला आहे. इराण विरोधातील लष्करी कारवाईत अमेरिकेने आपली तब्बल ४२ विमाने गमावली आहेत. यामध्ये अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि लष्करी ड्रोन्सचा समावेश आहे.
एका ताज्या अहवालानुसार, या युद्धासाठी अमेरिकेचा एकूण खर्च आतापर्यंत २९ अब्ज डॉलर्स (अंदाजे २.४ लाख कोटी रुपये) च्या वर गेला आहे. युद्धात मोठ्या प्रमाणावर झालेला दारूगोळा आणि उपकरणांचा वापर तसेच त्यांच्या दुरुस्तीमुळे या खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. या वाढत्या खर्चामुळे अमेरिकेला आपले संरक्षण बजेट देखील वाढवावे लागले आहे.





