Traffic Changes: महाराष्ट्र केसरीनिमित्त पुणे-नगर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी; 18 ते 22 मार्च दुपारी 2 ते रात्री 11 वाहतूक बदल
Traffic Changes: वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी जड वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.

Traffic Changes: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद ते खराडी बाह्यवळण मार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी १८ ते २२ मार्च या कालावधीत दररोज दुपारी २ ते रात्री ११ वाजेपर्यंत लागू राहील.
स्पर्धेनिमित्त राज्यभरातून कुस्ती शौकीन लोणीकंद परिसरात मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. प्रचंड गर्दी आणि रस्त्याच्या दुतर्फा उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होण्याची भीती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या वाहनांना बंदी?
या आदेशानुसार मालवाहतूक ट्रक, प्रवासी आराम बस, बल्कर, तसेच जेसीबी, रोड रोलर आणि ट्रॅक्टरसारखी मंदगती अवजड वाहने या वाहनांना प्रवेशबंदी असेल. या मार्गावर तसेच उपरस्त्यांवर अवजड वाहने उभी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पर्यायी मार्गाचे आवाहन
वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी जड वाहनचालकांनी या कालावधीत पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.





