Sunetra Pawar: यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर; राजकीय चर्चांना पुन्हा वेगळे वळण
Sunetra Pawar : सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमात शेजारी बसल्याने वेधलं लक्ष

Sunetra Pawar and Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar ) साताऱ्यात दाखल झाल्या आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील येथे होत्या. यानंतर दोन्ही नेत्या एकाच मंचावर आल्याचं दिसून आलं.
एकीकडे राज्यात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चा होत असताना आता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट चर्चेत आली आहे. यावेळी दोघी एकमेकांच्या समोर येऊन नतमस्तक झाल्याचेही दिसून आले.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर किर्तनाचा कार्यक्रम सुरू असून, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकाच कार्यक्रमात शेजारी बसल्याचे पाहायला मिळाले. दोघीही समाधीस्थळी अभिवादनासाठी वेगवेगळ्या वेळी दाखल झाल्या. मात्र, त्यानंतर काही काळ एकत्रित भजन कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना वेगळे वळण मिळाले. (Sunetra Pawar)
Sunetra Pawar: यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर; राजकीय चर्चांना पुन्हा वेगळे वळण
या दोन्ही नेत्यांचे एकाच व्यासपीठावर आणि अगदी शेजारी बसणे उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले. या दरम्यान व्यासपीठावर इतर नेते आणि कार्यकर्त्यांचीही मोठी गर्दी दिसून आली.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादा गेली अनेक वर्षे नियमीतपणे येथे यायचे दुर्दैव आहे, दादाला जाऊन येत्या 28 तारखेला दहा महिने पूर्ण होतील आणि मला आजही वाटतं नाही की, दादा आपल्यात नाही. तर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी आधीही सांगितलं आहे, आणि या प्रश्नावर राम कृष्ण हरी, असं म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.
हेही वाचा :





