Sri Lanka Beats Pakistan : निशान मधुष्काची झुंजार खेळी अन् शेवटच्या जोडीचा कहर! पाकिस्तान-ए ला धूळ चारत श्रीलंका-ए संघ बनला आशिया चॅम्पियन
Sri Lanka Beats Pakistan : आशिया कप रायझिंग स्टार्स २०२६ च्या अंतिम सामन्यात, श्रीलंका 'अ' संघाने १९८/९ अशा पिछाडीवरून मुसंडी मारत, शेवटच्या विकेटसाठी नाबाद भागीदारीच्या जोरावर पाकिस्तान 'अ' संघाला १ गडी राखून पराभूत केले.

Sri Lanka A Beats Pakistan A by 1 wicket in a thrilling final : एसीसी मेन्स आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६ च्या अत्यंत अटीतटीच्या अंतिम सामन्यात श्रीलंका-ए संघाने पाकिस्तान-ए चा एक गडी राखून थरारक पराभव करत विजेतेपदावर मोहर उमटवली. २१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकवेळ श्रीलंकेने १९८ धावांत नऊ गडी गमावले होते आणि त्यांच्या विजयाच्या आशा जवळपास मावळल्या होत्या. मात्र, अखेरच्या जोडीने अभेद्य भागीदारी करत लक्ष्य गाठले आणि पाकिस्तानी गोटाचे स्वप्न भंग केले.
नऊ बाद १९८ वरून समराकून-संकेथची निर्णायक अभेद्य भागीदारी –
नऊ बाद १९८ अशा अत्यंत कठीण परिस्थितीत लाहिरू समराकून आणि गरुका संकेथ यांनी प्रचंड संयम व धैर्य दाखवत शेवटची विकेट पडू दिली नाही. समराकूनने २१ चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद ११ धावा, तर संकेथने सात चेंडूंत नाबाद चार धावा केल्या. दोघांनी दहाव्या गड्यासाठी १९ धावांची निर्णायक भागीदारी रचत ४१.२ षटकांत नऊ बाद २१७ धावांवर संघाला अविस्मरणीय आणि ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
निशान मधुष्काची ८७ धावांची झुंजार खेळी ठरली मोलाची –
Winning Moment ❤️🇱🇰
Sri Lanka clinch their 3rd Asia Cup Rising Stars title after defeating Pakistan by ONE WICKET in a nail-biting final that went right down to the wire!
Congratulations, Champions! 🇱🇰🏆🦁 https://t.co/Yz5kui9J8E
— Sri Lanka Tweet 🇱🇰 (@SriLankaTweet) November 29, 2026
आव्हानाचा पाठलाग करताना निशान मधुष्काने एक बाजू लावून धरत ९५ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह ८७ धावांची शानदार खेळी साकारली. त्याला कर्णधार पवन रथनायके (३०), लसिथ क्रूसपुले (२६), सिनेथ जयवर्धने (२०), विजयकांत वियास्कंथ (१३) आणि जेनिथ लियानागे (११) यांनी साथ दिली. १४०/२ वरून १४०/४ आणि १९८/६ वरून १९८/९ अशा पडझडीने सामना शेवटच्या क्षणापर्यंत कमालीचा थरारक ठेवला.
पाकिस्तान-ए संघाला २१६ धावांवर रोखलं –
Sri Lanka beat Pakistan in Rising asia cup final 😂 https://t.co/kHvz5mHfhZ
— 𝐙𝐨𝐫𝐚𝐖𝐚𝐫 𝐁𝐚𝐣𝐰𝐚 (@TheRock1799) November 29, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान-ए संघाला ५० षटकांत नऊ बाद २१६ धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून साहिबजादा खानने सर्वाधिक ६०, शामल हुसेनने ४०, रोहेल नझीरने ३७ आणि कर्णधार अब्दुल समदने ३३ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांचा मधला आणि तळाचा क्रम ढेपाळला. याचा पुरेपूर फायदा उचलत श्रीलंकन गोलंदाजांनी व शेवटच्या जोडीने स्पर्धेच्या जेतेपदावर दिमाखात कब्जा केला.





