Sanjay Raut : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराचे संकेत; समोर आलेल्या कलांवर संजय राऊतांचा घणाघात! मोदीं अन् शाहांना म्हणाले…
Sanjay Raut : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे प्राथमिक कल समोर येत असून, उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Sanjay Raut : पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे प्राथमिक कल समोर आले असून, या कलांमध्ये सत्तांतराचे संकेत दिसत आहेत. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भाजपकडे सत्ता झुकत असल्याची चिन्हे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वीच्या एसआयआर प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी आयोगाच्या भूमिकेवरही शंका व्यक्त केली.
राऊत म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दुसरं काय काम आहे. निवडणुकीत तळ ठोकणे हेच, त्यांचे काम आहे. महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचार होत आहेत. देशात भ्रष्टाचार सुरू आहे. महागाई वाढली आहे. नोकऱ्या नाहीत. हे त्यांना दिसत नाही.”

Sanjay Raut : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराचे संकेत; समोर आलेल्या कलांवर संजय राऊतांचा घणाघात! मोदीं अन् शाहांना म्हणाले…
निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष आहे. मित्रपक्ष जर निवडणूक आयोग असेल, तर काहीही होऊ शकतं असे म्हणत निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा आरोप संजय राऊतांनी केला. ( Sanjay Raut)
तसेच त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये सुमारे ९० लाख मतदार वगळल्याचा दावा केला. स्ट्राँग रूमवरील सीसीटीव्ही गायब होणे, लाईट बंद करणे यांसारख्या प्रकारांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक निकालाविषयी बोलताना म्हणाले…
पोटनिवडणुका या प्रतीकात्मक असतात. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामतीत कुणीही प्रमुख पक्ष लढलेला नाही. काही अपक्ष निवडणुकीला उभे राहिल्याने तिथे निवडणूक होत आहे. (Sanjay Raut)
राहुरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार दिला आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार असल्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे.
राहुरी पोटनिवडणूक ही दिवंगत भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर होत आहे. त्यामुळे त्याचा फायदा त्यांचे पुत्र अक्षय कर्डिलेंचा होणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.





