Sheikh Hasina: भारतात राहणाऱ्या शेख हसीना यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी मायदेशी परतणार
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्या डिसेंबर २०२६ मध्ये भारतातून बांगलादेशला परत येतील आणि तेथील न्यायालयात आत्मसमर्पण करतील, असे त्यांनी म्हटले आहे.

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्या डिसेंबर २०२६ मध्ये भारतातून बांगलादेशला परत येतील आणि तेथील न्यायालयात आत्मसमर्पण करतील, असे त्यांनी म्हटले आहे.
मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतरही आपल्या जीवाला धोका असल्याचे हसीना यांनी म्हटले आहे, परंतु त्या आपल्या देशात परतण्याचा निर्णय बदलणार नाहीत.
रॉयटर्सला दिलेल्या सुमारे तासभराच्या दूरध्वनी मुलाखतीत, ७८ वर्षीय हसीना यांनी, आवामी लीगचे अनेक वरिष्ठ नेतेही त्यांच्यासोबत बांगलादेशला परत येतील आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जातील” असे म्हटले आहे.
बांगलादेशातील लष्करी उठाव आणि हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर, ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना भारतातून पळून गेल्या होत्या, ज्यानंतर भारताने त्यांना आश्रय दिला होता.
त्यानंतर, नोव्हेंबर २०२५ मध्ये, बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (आयसीटी) २०२४ च्या आंदोलनादरम्यान झालेल्या दडपशाही आणि मृत्यू प्रकरणी शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. तथापि, हसीना यांनी हे सर्व आरोप तीव्रपणे नाकारले आहेत.
मला जायलाच पाहिजे (Sheikh Hasina)
त्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा ढाका भारतातून त्यांच्या प्रत्यार्पणाची सातत्याने मागणी करत आहे. हसीना म्हणाल्या की, मृत्युदंडाची शिक्षा होऊनही त्या परत येतील.
शेख हसीना यांनी रॉयटर्सला सांगितले, “जेव्हा मी परत येईन, तेव्हा ते मला अटक करू शकतात. ते मला ठारही मारू शकतात… पण तरीही, मला जायलाच पाहिजे. माझ्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सध्या बांगलादेशात भयंकर दडपशाही आणि अत्याचाराचा सामना करत आहेत. जर मृत्यू मला येणार असेल, तर तो माझ्याच भूमीवर यावा, जिथे माझ्या आई-वडिलांना दफन केले आहे आणि जिथे त्यांचे रक्त सांडले होते.”

Sheikh Hasina: भारतात राहणाऱ्या शेख हसीना यांची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी मायदेशी परतणार
शेख हसीना यांच्यासोबत परत येणाऱ्या नेत्यांच्या यादीत देशाचे माजी गृहमंत्री असदुझमान खान कमाल यांचाही समावेश असू शकतो, ज्यांना बांगलादेशच्या न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
ढाका भारतातून त्यांच्या प्रत्यार्पणाची सातत्याने मागणी करत आहे. बांगलादेशात, प्रथम मुहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार आणि आता पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी सरकार, भारतातून शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची सातत्याने मागणी करत आहे. हसीना यांनी रॉयटर्सला सांगितले की, त्यांनी आपल्या परतण्यासंदर्भात कोणत्याही परदेशी सरकारशी कोणतीही चर्चा केलेली नाही.
भारताची भूमिका काय आहे? (Sheikh Hasina)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, भारत बांगलादेशच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीचा आढावा घेत असून, नवीन सरकारसोबत रचनात्मक संवाद कायम ठेवण्याची आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हसीना म्हणाल्या की, ढाका सरकार भारताला सातत्याने पत्रे पाठवत आहे, परंतु त्यांनी पुनरुच्चार केला की, “मला पाठवण्यासाठी कोणाचीही गरज भासणार नाही; मी स्वतःहून माझ्या देशात परत येईन.”





