Sairaj Bahutule Coach : टीम इंडियाला मिळणार नवा कोच! आयपीएलचा हंगाम संपताच ‘हा’ माजी खेळाडू स्वीकारणार पदभार
Sairaj Bahutule Coach : सध्या ते आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सच्या गोटात स्पिन बॉलिंग कोचची जबाबदारी सांभाळत आहेत.

Sairaj Bahutule be appointed as Team India’s spin bowling coach : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आता आपल्या सपोर्ट स्टाफची भक्कम बांधणी करताना दिसत आहेत. मुंबईचे माजी लेग स्पिनर साईराज बहुतुले यांची भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या स्पिन बॉलिंग कोचपदी नियुक्ती होणार असल्याची दाट शक्यता आहे. बहुतुले सध्या आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सच्या गोटात स्पिन बॉलिंग कोचची जबाबदारी सांभाळत आहेत, मात्र या हंगामांनंतर ते पंजाबची साथ सोडून राष्ट्रीय संघाशी जोडले जातील.
गंभीर बहुतुलेंच्या कौशल्यावर फिदा –
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५३ वर्षीय साईराज बहुतुले यांच्या कोचिंग कौशल्याने गौतम गंभीर प्रचंड प्रभावित झाला आहे. उभयतांमध्ये या संदर्भात यशस्वी चर्चाही झाली असून गंभीरनेच त्यांच्या नावाची शिफारस केली असल्याचे समजते. बहुतुले यांचा कार्यकाळ जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या घरच्या मालिकेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय कोचिंग टीममध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून सितांशु कोटक, वेगवान गोलंदाजीसाठी मॉर्ने मॉर्कल, फिल्डिंग कोच टी. दिलीप आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून रायन टेन डेशकाटे कार्यरत आहेत. मात्र, अद्याप विशेष स्पिन कोच नसल्याने बहुतुलेंची एन्ट्री महत्त्वाची ठरेल.
🚨 SAIRAJ BAHUTULE AS SPIN COACH OF INDIA 🚨
– Sairaj Bahutule is set to join the Team India as the spin bowling coach. (TOI). pic.twitter.com/r1Tvwq0oJ7
— KUMAR (@MyCric101) May 8, 2026
अनुभवाचा दांडगा वारसा –
TEAM INDIA SET TO BRING IN NEW SPIN COACH! 🚨
Former India leg-spinner Sairaj Bahutule is reportedly set to join the Team India setup as spin bowling coach soon. [ANI]🇮🇳 pic.twitter.com/R2wvLQmZkW
— Puneet Awasthi (@PuneetA77622712) May 8, 2026
साईराज बहुतुले यांनी २००१ ते २००३ दरम्यान भारतासाठी दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापूर्वीही त्यांनी राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधून भारतीय संघाला मदत केली आहे. २०२३ च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान राहुल द्रविड यांनी विशेष विनंती करून बहुतुलेंना टीम इंडियाचा भाग बनवले होते.
पंजाब किंग्सचा निरोप घेणार?
सध्या बहुतुले हे पंजाब किंग्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्या टीमचा हिस्सा आहेत. मात्र, भारतीय संघाची ऑफर आल्यामुळे ते आपला आयपीएलमधील कार्यकाळ मध्येच सोडू शकतात. बीसीसीआय आणि राष्ट्रीय संघाचा प्रश्न असल्याने पंजाब किंग्सचे व्यवस्थापनही त्यांच्या मार्गात अडथळा आणणार नाही, असे चिन्हे आहेत. बहुतुलेंच्या नियुक्तीमुळे भारतीय फिरकीपटूंना, विशेषतः युवा फिरकी गोलंदाजांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.





