Rajinikanth : थलपती विजयच्या यशावर रजनीकांत नाराज असल्याच्या चर्चा; एम. के. स्टॅलिनच्या भेटीवरुन टीका होताच स्पष्ट केली भूमिका
Rajinikanth : रजनीकांत यांनी चेन्नईतील त्यांच्या पोएस गार्डन निवासस्थानी अनपेक्षित पत्रकार परिषद घेतली,

Rajinikanth : तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या पक्षाला मिळालेल्या यशावर नाराज असल्याची चर्चा होती. या सर्व चर्चांवर रजनीकांत यांनी समोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
रजनीकांत यांनी चेन्नईतील त्यांच्या पोएस गार्डन निवासस्थानी अनपेक्षित पत्रकार परिषद बोलावली, ज्यात त्यांनी, विजयने प्रस्थापित पक्षांविरुद्ध एकट्याने निवडणूक जिंकली आहे आणि स्वतःच्या बळावर स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, जे कौतुकास्पद असल्याचे म्हंटले आहे.
निवडणुकीसंदर्भात त्यांच्याबद्दल पसरलेल्या अफवांबद्दल रजनीकांत म्हणाले, “जर मी या अफवांना उत्तर दिल नाही, तर त्या खऱ्या मानल्या जातील. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मी एम.के. स्टॅलिन यांना भेटायला गेलो होतो, ज्यावर विनाकारण टीका झाली. लोकांनी हे समजून घेतले पाहिजे की आमची मैत्री राजकारणाच्या पलीकडची आहे. कुलाथूर मतदारसंघात एम.के. स्टॅलिन यांच्या पराभवाने मला वैयक्तिकरित्या खूप दुःख झाले.” Rajinikanth
Katrina Kaif : विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाने दाखवली मुलगा वियानची पहिली झलक; चाहत्यांमध्ये उत्साह
राज्यपालांसमोर जेव्हा टीव्हीके पक्ष बहुमत सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत होता तेव्हा रजनीकांत यांनी कोणतीच टिप्पणी केली नाही आणि नंतर विजय यांच्या शपथविधी सोहळ्यालाही ते उपस्थित राहिले नाहीत, असेही आरोप त्यांच्यावर झाले. याविषयी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारताच रजनीकांत थेट म्हणाले, “मी कधीही शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलो नाही. तुम्ही मला कधी माजी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यांमध्ये पाहिलंय का?” असा सवाल केला.
“रजनीकांत काही नीच किंवा हलकट माणूस नाही की जो एखाद्या गोष्टीवर विनाकारण टिप्पणी करेल. मी राजकारणात नाही, त्यामुळे विजयवर ईर्षा का असेल? विजय आणि माझ्यात 28 वर्षांचं अंतर आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल मत्सर वाटण्याचं काहीच कारण नाही. उलट मला त्यांचा आनंदच आहे.
विजय यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत. त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. 52 वर्षांत त्यांनी एमजीआर आणि एनटीआर यांच्यापेक्षाही जास्त यश मिळवलं आहे. त्यांनी केंद्रा भाजपविरुद्ध आणि इथे इतर दोन पक्षांविरुद्ध निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. हा माझ्यासाठी एक सुखद आणि आश्चर्यकारक अनुभव होता,” असे रजणीकांत म्हणाले. यावेळी त्यांनी 2021 ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली असती, तर मी जिंकलो असतो, असा विश्वासही व्यक्त केला. Rajinikanth
हेही वाचा:






