Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिचा बराचसा वेळ मुलगा वियानसोबत घालवत असून सार्वजनिक कार्यक्रमांपासूनही ती काहीशी दूर राहणे पसंत करत आहे. त्यामुळे तिच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टकडे चाहत्यांचे विशेष लक्ष असते. दरम्यान, पती विकी याच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त कतरिनाने खास पोस्ट शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कतरिनाने विकीच्या वाढदिवसानिमित्त चार खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये हे दोघे एका सुंदर बागेत निवांत क्षण घालवताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये विकी, कतरिना आणि त्यांचा मुलगा वियान एकत्र दिसत आहेत. वियानचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी त्याची पहिली झलक पाहून चाहते आनंदित झाले आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये “Happy Birthday Papa” असा संदेश असलेला केक दिसतो, तर चौथ्या फोटोमध्ये विकी आणि कतरिना मनमोकळेपणाने हसताना दिसत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये कतरिना आणि विकीने त्यांच्या पहिल्या मुलगा वियानचे स्वागत केले होते. वियानच्या जन्मानंतरचा हा विकी कौशल पहिला वाढदिवस आहे. View this post on Instagram A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) वाढदिवसानिमित्त कतरिनाने विकीसाठी भावनिक पोस्टही लिहिली असून यामध्ये “दोन वर्षांपूर्वीची तीच जागा, पण आता आयुष्यात खूप काही बदललं आहे. आज आपल्या छोट्या देवदूतासोबत तुझा वाढदिवस साजरा करताना मन कृतज्ञतेने भरून आलं आहे,” असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच विकी हा तिच्यासाठी “शक्ती, प्रेम आणि प्रकाशाचा आधारस्तंभ” असल्याचेही तिने नमूद केले. या पोस्टवर अनेक बॉलिवूड कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. करिना कपूर खान हिने “तुम्हा दोघांसाठी खूप आनंद झाला” अशी प्रतिक्रिया दिली, तर अनन्या पांडे हिने “सर्वोत्तम” असे म्हटले. याशिवाय करन जोहर सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरीनेही पोस्टला पसंती दिली आहे. काही वर्षांच्या डेटिंगनंतर कतरिना कैफ आणि विकी कौशल २०२१ मध्ये विवाहबंधात अडकले. दोघेही त्यांच्या आयुष्यात आनंदी असून, त्यांच्या आयुष्यात वियानच्या आगमनानंतर विकीचा वाढदिवस आणखी खास ठरला आहे. हेही वाचा : Raw Milk: ग्लोइंग स्किनसाठी कच्चं दूध वापरता? मग ‘हे’ धोकेही जाणून घ्या