Prateek Yadav’s death: माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा काळाच्या पडद्याआड; प्रतीक यादव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा
Prateek Yadav's death: समाजवादी पक्षाचे संस्थापक तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे धाकटे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचे बुधवारी अचानक निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.

Prateek Yadav’s death: समाजवादी पक्षाचे संस्थापक तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे धाकटे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव (Pratik Yadav) यांचे बुधवारी अचानक निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल विविध पक्षांतील नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रतीक यादव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना पहाटे लखनौ येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. फुफ्फुसांच्या आजारामुळे मृत्यू झाल्या माहिती समोर येत आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आणि प्रतीक यादव यांचे काका शिवपाल सिंह यादव (Shivpal Singh Yadav) यांनी या घटनेला “अत्यंत दु:खद” संबोधत दिवंगत आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना केली.
भाजपकडून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य (Keshav Prasad Maurya) यांनी यादव कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करत दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली. दुसरे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक (Brajesh Pathak) यांनीही ही बातमी “अत्यंत वेदनादायी” असल्याचे म्हटले. (Prateek Yadav’s death)

Prateek Yadav’s death: माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा काळाच्या पडद्याआड; प्रतीक यादव यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा
उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी शोकसंदेश पाठवला, तर माजी खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी या घटनेला “हृदयद्रावक” असे संबोधले. (Prateek Yadav’s death)
उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय राय (Ajay Rai) यांनीही यादव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत शोक व्यक्त केला.
दरम्यान, उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा बबिता सिंह चौहान (Babita Singh Chauhan) यांनी प्रतीक यादव यांच्या पत्नी तथा राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव (Aparna Yadav) यांची भेट घेत सांत्वन केले. “अलीकडे कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत,” असे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.





