Modi-Trump meeting: मोदी-ट्रम्प भेटीवर नवा वाद! भारताने प्रश्न विचारण्यास नकार दिल्याचा दावा
Modi-Trump meeting:

Modi-Trump meeting: भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी दावा केला की, फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान संपूर्ण पत्रकार परिषद टाळण्याची विनंती भारताने केली होती. समोर आलेल्या या दाव्यांना आता सरकारकडून उत्तर देण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून समोर आलेल्या माहितीनुसार,”कोणत्याही व्हीव्हीआयपी भेटीपूर्वी, नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यवस्थेबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा केली जाते आणि ही एक मानक प्रक्रिया आहे.” असे सांगण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारतीय बाजूने व्हीव्हीआयपी भेटींसाठीच्या आपल्या सामान्य आणि मानक प्रक्रियेबद्दल माहिती दिली. सूत्रांनी असेही सांगितले की, कोणत्याही व्हीव्हीआयपी भेटीपूर्वी नेत्यांच्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या व्यवस्थेबाबत चर्चा केली जाते.
सर्जिओ गोर काय म्हणाले? Modi-Trump meeting:
रविवारी, ‘इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम’मध्ये अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी खुलासा केला की, फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीदरम्यान भारताने संपूर्ण पत्रकार परिषदेची मागणी केली होती.
गोर पुढे बोलताना, “ट्रम्प यांनी भारतीय बाजूच्या काही मागण्या आहेत का, असे विचारले होते. गोर म्हणाले, “परराष्ट्र मंत्रालयाची (MEA) इच्छा आहे की माध्यमांना आमंत्रित केले जावे, पण संपूर्ण पत्रकार परिषद नको.” असे म्हणाले.
गोर म्हणाले की, त्यांनी भारताच्या या पसंतीबद्दल ट्रम्प यांना कळवले होते. ते म्हणाले, “भारतीयांना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत.” ट्रम्प यांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.
गोर यांच्या दाव्यांबाबत, भारतीय सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की व्हीव्हीआयपींच्या दौऱ्यांपूर्वी नेत्यांमधील सार्वजनिक कार्यक्रमांसंदर्भातील चर्चा ही एक सामान्य प्रक्रिया आहे.






