Milk Price Hike: महागाईचा झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून दरात वाढ
Milk Price Hike: : हे नवे दर गुरुवार, १४ मेपासून लागू होतील.

Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे. यातच आता दूधाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. अमूल दूध आणि मदर डेअरीच्या दुधामध्ये प्रति लिटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. हे नवे दर गुरुवार, १४ मेपासून लागू होतील.
अमूलचे संचालन करणाऱ्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन या कंपनीनुसार, पशुखाद्य, दुधाचे पॅकेजिंग आणि इंधनाच्या दरात वर्षभरात मोठी वाढ झाल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.
याआधी मे २०२५ मध्ये दुधाच्या दरात वाढ करण्यात आली होती. ही दरवाढ सरासरी २.५ ते ३.५ टक्क्यांच्या दरम्यान असून, जी सर्वसाधारण अन्नधान्य महागाई दरापेक्षा कमी आहे.
मदर डेअरीनेही आपल्या सर्व प्रकारच्या दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. मदर डेअरीने परिपत्रक काढत सांगितले की, गेल्या वर्षात शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्याच्या दरामध्ये ६ टक्के वाढ झाली असून ग्राहकांवरील भार कमी करण्याचे सर्व प्रयत्न करून ही दरवाढ करण्यात आली आहे.
अमूल दूधाचे दर –
- अमूल फ्रेश (१ लिटर) – आधी ५५ रुपये, आता ५७ रुपये
- अमूल गोल्ड (५०० मिली)- आधी ३१ रुपये, आता ३२ रुपये
- अमूल म्हशीचे दूध (१ लिटर) – आधी ६३ रुपये, आता ६६ रुपये
- अमूल गायीचे दूध (५०० मिली) – आधी ३४ रुपये, आता ३५ रुपये
मदर डेअरीच्या दूधाचे दर –
- बल्क वेंडेड मिल्क – आधी ५६ रुपये, आता ५८ रुपये
- फुल क्रीम मिल्क – आधी ७० रुपये, आता ७२ रुपये
- प्रो मिल्क – आधी ७० रुपये, आता ७२ रुपये
- गाईचे दूध – आधी ६० रुपये, आता ६२ रुपये
हेही वाचा:






