Kangana Ranaut On Tapsee Pannu: ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’; कंगणाचा थेट तापसीच्या पालकांवर निशाणा
Kangana Ranaut On Tapsee Pannu: कंगनाकडून तापसीचा ‘बी-ग्रेड अभिनेत्री’ म्हणून उल्लेख

Kangana Ranaut On Tapsee Pannu: अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणौत आणि तापसी पन्नू यांच्यात पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. एका मुलाखतीदरम्यान, तापसी पन्नूच्या वक्तव्यामुळे कंगना चांगलीच संतापली आहे. कंगना रनौतने तापसीवर तिच्या आई-वडिलांचा आणि संगोपनाचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
त्यानंतर तिने थेट तापसीच्या आई- वडिलांना ‘स्वस्त कॉपी का जन्माला घातली?’ असा सवाल केला आहे. कंगणाकडून तापसीचा थेट स्वस्त कॉपी असा उल्लेख करण्यात आला आहे.
तापसी पन्नू तिच्या आगामी ‘गांधारी’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एका कार्यक्रमात उपस्थित होती. त्यावेळी तिला कंगना रनौतसोबतचा वाद मिटला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत तापसी म्हणाली, “मी तिला भेटलेले नाही. जेव्हा हे मुद्दे पहिल्यांदा समोर आले, तेव्हाही मी तिला भेटले नव्हते आणि त्यानंतरही मी तिला भेटलेले नाही.
एखाद्या व्यक्तीबद्दलचे आपले मत हे आपले संगोपन, बोलण्याची पद्धत आणि गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवत असते. त्यामुळे आम्ही दोघी कुठून आलो आहोत हे ठरवण्यासाठी एवढं पुरेसे आहे, असे मला वाटते.”
कंगना रनौतची पोस्ट
तापसीचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि त्यानंतर कंगना रनौतने इंस्टाग्राम स्टोरीवर संतप्त प्रतिक्रिया दिली. कंगनाने म्हटलं, “एक स्वस्त कॉपी तिच्या आगामी बी-ग्रेड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र, नेहमीप्रमाणेच माध्यमांमध्ये चर्चेचा मुख्य विषय कंगना रनौतच आहे. आज तर तिने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा ओलांडून तिने माझ्या आई-वडिलांची आणि माझ्या संस्कारांची थट्टा केली आहे.” Kangana Ranaut On Tapsee Pannu
‘माझ्या आई-वडिलांप्रमाणे त्यांनी ‘ओरिजिनल’ व्यक्तीला जन्म का दिला नाही?’
कंगनाने पुढे लिहिले, “माझा विश्वास आहे की सर्व पालक आपापल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करतात आणि मी कधीही आई-वडिलांना कोणत्याही वादात ओढत नाही; पण आज मला तिच्या आई-वडिलांनाही विचारायचे आहे, माझ्या आई-वडिलांप्रमाणे त्यांनी ‘ओरिजिनल’ व्यक्तीला जन्म का दिला नाही? एक स्वस्त कॉपी का जन्मला घातली? तुमच्या प्रयत्नांबद्दल खरंच वाईट वाटतं.”
दरम्यन, 2020 मध्ये नेपोटिझमच्या मुद्द्यावर बोलताना कंगनाने तापसीला ‘बी-ग्रेड अभिनेत्री’ म्हटलं होतं. तेव्हापासून दोघींमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला आहे. Kangana Ranaut On Tapsee Pannu
हेही वाचा:






