Gunratna Sadavarte : “DJ बंद करुन दाखवाच”; गुणरत्न सदावर्तेंचे राज ठाकरेंना ओपन चॅलेंज
Gunratna Sadavarte On Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भूमिकेवर अॅड गुणरत्न सदावर्ते यांची टीका

Gunratna Sadavarte : महाराष्ट्रात डीजे, डॉल्बी साऊंड सिस्टीम आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून वाद निर्माण झाला आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान, या मागणीला अनेकांकडून विरोधही केला जात आहे. त्यामुळे यात दोन गट निर्माण झाले आहेत. याच मुद्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (Gunratna Sadavarte )
कशाला पाहिजे डीजे, डॉल्बी पारंपारीक सण नाही का साजरे करता येत? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंच्या या भूमिकेवर अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली आहे. डीजे बंद करुन दाखवाच असं आव्हान सदावर्ते यांनी राज ठाकरेंना दिलं आहे. (Gunratna Sadavarte )
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? (Gunratna Sadavarte )
“राज ठाकरेंच्या डोक्याचा खोका खाली आहे का? DJ वाजवण्यावर बंदी आली नाही पाहिजे, भारतीय संविधानाने सनवार साजरे करायचे नियम दिले आहेत. भीम जयंती हीच दिवाळी आहे. DJ वाजणारच… कायद्याची पायमल्ली कोणी करत नाही. प्रत्येक तरुणाच्या मनात गणपती बाप्पासाठी आनंद असतो. ज्या मंडळांना डीजे लावू नका म्हंटले जाईल, त्रास दिला जाईल, त्या सर्वांसाठी मी उभा आहे, DJ संदर्भात कोणाला त्रास देत असेल तर मला कॉल करा. राज ठाकरेंना आव्हान आहे की DJ बंद करुन दाखवा, “असे थेट आव्हान गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना दिले आहे.
राज ठाकरे काय म्हणाले होते?
“कसले डॉल्बी वगैरे लावत आहात? कसले डीजे? आपल्या पारंपरिक पद्धतीने सण का साजरे होत नाहीयत? इतक्या श्रद्धेने गणपती घरी आणायचा. आणि विसर्जन करताना नाचता? कसला आनंद होतोय? यात कसला आनंद साजरा करताय? माझ्या घरी दीड दिवसांचा गणपती येतो. मुलांसाठी मी आणला. ज्यावेळी गणपती जातो तेव्हा ओकंबोकं वाटतं घर. उत्साह गेल्यासारखा वाटतं. वाईट वाटतं त्यावेळेला. मग वाईट वाटण्याऐवजी कसला उत्साह साजरा करताय?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता.
“आपण उत्तरेतील संस्कृती महाराष्ट्रात आणतोय का? आता इथे गोविंदाच्या वेळेला महिलांना व्यासपीठावर आणून नाचायचं. हे सर्व उत्तरेत चालतं. ते आपण महाराष्ट्रात आणतोय का? आपण त्यांना शिकवायचं की आपण त्यांचं घ्यायचं? कोण आहोत आपण? काय आहे महाराष्ट्राचा इतिहास? महाराष्ट्राने किती गोष्टी शिकवल्या? मध्यंतरी महाराष्ट्राचं रुप दाखवलं होतं, माणसं कशी होऊ गेली आपल्याकडे. हा महाराष्ट्र त्यांचं अनुकरण करतोय? सण कशाप्रकारे साजरा व्हायला हवा? आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरा केला पाहिजे”, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले होते.
हेही वाचा:
Pune Police Raid: खराडीत स्पाच्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! बनावट ग्राहक पाठवून पोलिसांची कारवाई






