INDIA Bloc Protest: इंडिया आघाडीचे खासदार लंचसाठी कॅनॉट प्लेसमध्ये दाखल ; राजघाटाकडे कूच करण्याचे नियोजन
INDIA Bloc Protest: विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि एसआयआरवर सातत्याने टीका करत आहेत. विरोधी पक्षांचे आंदोलन आजदेखील सुरू राहणार आहे.

INDIA Bloc Protest: विरोधी पक्ष मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार आणि एसआयआरवर सातत्याने टीका करत आहेत. विरोधी पक्षांचे आंदोलन आजदेखील सुरू राहणार आहे.
इंडिया अलायन्सचे खासदार राजघाटाच्या दिशेने मोर्चा काढतील. त्यानंतर सायंकाळी ५:०० च्या सुमारास कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. दिल्लीत उपलब्ध असलेले इंडिया अलायन्सचे सर्व खासदार या मोर्चात सहभागी होतील.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी दुपारी १:४५ वाजता स्नेहभोजन बैठक बोलावली आहे. खर्गे यांनी बुधवारी दिल्लीतील सागर रत्ना हॉटेलमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजनही केले होते.
विरोधी पक्षांचे प्रमुख नेते मंगळवारपासून रस्त्यावर उतरले आहेत. ६ ऑक्टोबर रोजी इंडिया अलायन्सच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, पोलिसांनी सर्व नेत्यांना ताब्यात घेतले. विरोधी पक्षांचा दावा आहे की, या मोर्चात लोकसभा आणि राज्यसभेतील सुमारे ३०० खासदार सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आकाशवाणी भवनमध्ये प्रवेश करून तेथे अनेक तास धरणे आंदोलन केले, जिथे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
#WATCH | Delhi: LoP Lok Sabha Rahul Gandhi arrives for the second lunch meeting of the Opposition MPs in Connaught Place. https://t.co/Kj6XNDO2lX
— ANI (@ANI) October 8, 2026
बुधवारी खरगे यांच्या दुपारच्या जेवणानंतर खासदार जंतर मंतरकडे निघाले, जिथे राहुल गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी प्रियांका गांधी इतर खासदारांसोबत रस्त्यावर झोपल्या. नंतर, प्रियांका गांधी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दिल्ली पोलिसांनी आकाशवाणी भवनमधील आंदोलन आणि बुधवारच्या आंदोलनासंदर्भात स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत. या एफआयआरमध्ये मारहाण, पोलीस कर्तव्यात अडथळा आणणे आणि गैरवर्तनाचे आरोप आहेत.
बुधवारी एफआयआरबद्दल विचारले असता राहुल गांधी म्हणाले, “हे माझ्यासाठी पदकासारखे आहे. माझ्याविरोधात ४५ एफआयआर दाखल झाले आहेत. माझे लक्ष्य १०० एफआयआर आहे.”
आज बिहारमध्येही विरोधी पक्ष आंदोलन करत आहेत. आरजेडी, काँग्रेस आणि महाआघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या चौकातून राजभवनापर्यंत मोर्चा काढला. मात्र, पोलीस कारवाईनंतर ३०० मीटरवरच हा मोर्चा थांबवण्यात आला.
दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) आज बंगळूरमधील फ्रीडम पार्कमध्ये आंदोलन करणार आहे. यापूर्वी, सीजेपीने असा दावा केला होता की, १० ऑक्टोबरच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जात आहे.





