Rupali Chakankar : ‘गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं, तर …’; गुवाहटी दौऱ्याचा फोटो समोर येताच रुपाली चाकणकर स्पष्टचं बोलल्या
Rupali Chakankar : नुकताच रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची काल ईडीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीअगोदर नाशिकला त्यांची एसआयटीकडून चौकशी करण्यात आली होती.
आता जी ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आली ती तब्बल आठ तास सुरू होती. चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधत अशोक खरातसोबत केला जाणाऱ्या आर्थिक व्यवहाराचा दावा फेटाळून लावला.
ईडीच्या चौकशीत अशोक खरातसोबत माझे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत. मी त्यांना गुरू मानत होते, तो फक्त श्रद्धेचा भाव होता, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं असल्याचे यावेळी सांगितलं.
अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर राज्यात नव्हे तर देशात या प्रकरणाची चर्चा झाली. राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आला.
खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा खरातचे पाद्यपूजन करतानाचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले होते.
यानंतर नुकताच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचा अशोक खरातसोबतचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवरून 2021 मध्ये खरात आणि चाकणकर यांनी एकत्र गुवाहाटी दौरा केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.
त्या दौऱ्यात रुपाली चाकणकर यांच्यासोबत त्यांची बहीण प्रतिभा चाकणकरही उपस्थित होत्या, अशी माहिती समोर आली आहे. या दौऱ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ईडीकडून चौकशीत त्याबाबतही प्रश्न विचारण्यात आले.

Rupali Chakankar : ‘गुरुसोबत देवीचं दर्शन करता आलं, तर …’; गुवाहटी दौऱ्याचा फोटो समोर येताच रुपाली चाकणकर स्पष्टचं बोलल्या
यावर स्पष्टीकरण देताना त्या म्हणाल्या, “अशोक खरात यांचं कुटुंब आधी गुवाहाटीला गेलं होतं. त्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासोबत देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. अनेकांची त्यांच्यावर श्रद्धा होती, आमचीही होती. गुरूसोबत देवीचं दर्शन घेण्याच्या अध्यात्मिक भावनेतून आम्ही हा दौरा केला होता.” आम्ही पुण्याहून स्वतंत्रपणे प्रवास करून गुवाहाटीला गेलो होतो. तिथे आम्ही एकत्र देवीचं दर्शन घेतलं,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Rupali Chakankar)
दरम्यान, या प्रकरणात आपला किंवा आपल्या कुटुंबाचा कोणताही आर्थिक संबंध नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. “मला जेव्हा चौकशीसाठी बोलावलं, तेव्हा मी सहकार्य केलं. शिर्डी पोलीस ठाण्यात माझ्या बहिणीचीही चौकशी झाली. मात्र समता पतसंस्थेशी आमचा कोणताही संबंध नाही. त्या संस्थेत बोगस खाती असल्याची माहिती समोर आली असली तरी आमचे कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा संबंध नाहीत,” असं त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : FridgeTips: सावधान! फ्रिज वापरताना ‘या’ सवयींमुळे वाढू शकतं वीज बिल





