Dia Mirza : ‘त्याचा अॅटिट्यूड वेगळ्याच पातळीवर’; नवाजुद्दीन सिद्दीकीला चांगलचं सुनावलं, दिया मिर्जाची पोस्ट व्हायरल
Dia Mirza : तिच्या या पोस्टमधील शब्दांमुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले असून, दोघांमध्ये नेमकं काय घडलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Dia Mirza : बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे मनोरंजनविश्वात खळबळ उडाली आहे. दिया मिर्झाने थेट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला पोस्ट टॅग करत त्याच्याबद्दल अत्यंत हीन दर्जाचे शब्द वापरले आहेत.
तिच्या या पोस्टमधील शब्दांमुळे चाहतेही आश्चर्यचकित झाले असून, दोघांमध्ये नेमकं काय घडलं, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिया मिर्झा सहसा वादांपासून दूर राहणे पसंत करते. ती आपली मतेही शांतपणे मांडताना दिसते. मात्र, यावेळी तिने केलेल्या पोस्टमधील आक्रमक शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल नेमकं काय म्हणाली दिया?
बुधवार, १८ नोव्हेंबर रोजी दियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. विशेष म्हणजे ही पोस्ट तिने थेट नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अधिकृत इंन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केली आहे. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत वाईट असल्याचे म्हटले आहे. ‘त्याच्यासोबत काम करणे म्हणजे एक दुःस्वप्न आहे. त्याचा अॅटिट्यूड वेगळ्याच पातळीवर आहे. पूर्णपणे आक्षेपार्ह व्यक्तिमत्त्व,’ असे पोस्टमध्ये दिया म्हणाली आहे.
तिच्या या पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांकडून अनेक प्रश्न विचारले जात असून, दोघांमध्ये नेमका कोणता वाद झाला, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दिया मिर्झा आणि नवाजुद्दीनमध्ये नेमकं काय घडलं?
दोघांमध्ये यापूर्वी काही वाद झाला होता का? एकत्र काम करताना काही कटू अनुभव आले होते का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
दरम्यान, दियाची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मात्र, तिने हे वक्तव्य नेमक्या कोणत्या कारणामुळे केले, याबाबत अद्याप सविस्तर खुलासा झालेला नाही. त्यामुळे दिया मिर्झा या पोस्टमागचे कारण अस्पष्ट आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यावर काय प्रतिक्रिया देणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Latif Bhat Encounter: कुलगाममधील चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर लतीफ भट ठार; शरण येण्यास नकार






