Janhvi Kapoor : बहिणीला संधी होती पण…; 300 कोटी बजेटच्या पिक्चरमध्ये ‘अशी’ झाली जान्हवी कपूरची एन्ट्री
Janhvi Kapoor : या चित्रपटात जान्हवी कपूर ‘अचियम्मा’ ही महत्त्वाची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे.

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपली छाप पाडताना दिसत आहे. ‘देवरा पार्ट १’ नंतर आता ती राम चरणसोबत आगामी ‘पेड्डी’ चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
या चित्रपटात ती ‘अचियम्मा’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. मात्र, या भूमिकेसाठी सुरुवातीला जान्हवी नव्हे तर तिची धाकटी बहीण खुशी कपूरची निवड करण्यात आली होती, असा खुलासा दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. (Janhvi Kapoor)
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी सांगितले की, त्यांनी सुरुवातीला खुशी कपूरला ‘अचियम्मा’च्या भूमिकेसाठी कथा ऐकवली होती. मात्र, प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांना खुशी या भूमिकेसाठी खूपच लहान वाटली.
याबाबत बोलताना बुची म्हणाले, “मी आधी खुशी कपूरला कथा ऐकवली होती. पण तिला भेटल्यानंतर मला जाणवलं की ती या भूमिकेसाठी योग्य नाही. त्यानंतर मला त्याच घरात जाऊन जान्हवीला कथा सांगावी लागली. तो क्षण माझ्यासाठी खूप अवघड होता.”
ते पुढे म्हणाले, “मी जान्हवीला स्पष्ट सांगितलं की खुशीला का नकार दिला. मी खुशीला भेटून ‘हाय’ म्हटलं आणि सांगितलं की मला या भूमिकेसाठी तिच्याऐवजी जान्हवी हवी आहे. सिनेमात कधी कधी अशा कठीण निर्णयांची गरज असते.” असेही त्यांनी बोलताना नमूद केलं.
दिग्दर्शकाने हेही स्पष्ट केले की, सुरुवातीपासूनच त्यांच्या मनात या भूमिकेसाठी जान्हवीच फिट बसत होती. “मी इतर कलाकारांना कथा सांगत असतानाही माझ्या डोळ्यासमोर ‘अचियम्मा’च्या भूमिकेत जान्हवीच होती.”
‘या’ दिवशी होणार रिलीज (Janhvi Kapoor)

Janhvi Kapoor : बहिणीला संधी होती पण…; 300 कोटी बजेटच्या पिक्चरमध्ये ‘अशी’ झाली जान्हवी कपूरची एन्ट्री
राम चरण आणि जान्हवी कपूर अभिनीत ‘पेड्डी’ हा चित्रपट ४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. हा एक अॅक्शन चित्रपट असून, मोठ्या स्केलवकर याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी समोर आली असून, प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.





