Gokul Milk Rate Hike: गोकुळ दूध संघाकडून गाईच्या दूध दरात वाढ; नवे दर कधीपासून होणार लागू?
Gokul Milk Rate Hike: म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये कोणताही बदल नाही

Gokul Milk Rate Hike: वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अमूल आणि मदर डेअरीने दूधाच्या किंमतीत वाढ केल्यानंतर आता गोकुळ दूध संघाच्या प्रशासकाकडून गाईच्या दुधाच्या विक्रीच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे.
दूधाच्या विक्री दरात प्रतिलीटर २ रुपयांनी वाढ झाली आहे. मात्र म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन रुपयांनी विक्रीमध्ये वाढ केली आहे.
कोल्हापूर दूध उत्पादक संघाने पत्रक काढत दूध दरवाढ जाहीर केली आहे. कोल्हापूरातून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यात वितरीत होणाऱ्या गोकुळ ब्रँडच्या सर्व पॉलिथीन पॅकिंगमधील गाय दुधाच्या दरात वाढ होत असल्याचं पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Khadki bazar firing : खडकी बाजारात भरदिवसा गोळीबार! परिसरात प्रचंड दहशत; पोलिसांकडून दोघांंना अटक
नवीन दर 21 मे पासून लागू
सीएनजीपासून पेट्रोल डीझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांमध्ये संताप दिसून येत असतानाच, आता दूध दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाला आहे. दरम्यान, गायीच्या विक्रीचा नवीन दर 21 मे पासून लागू होणार आहे. गोकुळवर प्रशासक आल्यानंतर पहिल्यांदाच विक्री दरामध्ये वाढ केली आहे.
दर वाढीमागचं कारण काय ?
काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरी या दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली आहे. आता गोकुळ दूध संघानेही दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचा वाढता दर, कच्च्या मालाच्या किंमती तसेच वाहतूक, पॅकेजिंग आणि इतर खर्चात सातत्याने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाने गाय दुधाच्या विक्री दरामध्ये प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा:






