Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ मध्ये स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण दिसणार? पहिली झलक समोर
Deool Band 2 : हा सिनेमा 21 मे 2026 रोजी जगभरात रिलीज होणार

Deool Band 2: 2015 साली आलेल्या दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता पुन्हा एकदा तब्बल 11 वर्षांनी देऊळ बंदचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिनेते मोहन जोशी यांनी स्वामी समर्थांची भूमिका साकारली होती. यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात स्वामी समर्थांच्या भूमिकेत कोण दिसणार ? याबाबत अनेकांना उत्सुकता होती.
अखेर स्वामींची भूमिका साकारणारा तो चेहरा समोर आला आहे. नुकतेच या सिनेमाचं आणखी एक मोशन पोस्टर समोर आलं आहे ज्यात स्वामींचं दर्शन होत आहे. अभिनेते मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहेत.
’11 वर्षांनंतर स्वामी पुन्हा अवतरलेत, पटकन दर्शन घ्या.. देऊळ पुन्हा बंद होऊ शकतं,’ असं कॅप्शन देत प्रवीण तरडेनं स्वामी समर्थांची झलक दाखवली. यावरून आता ‘देऊळ बंद 2’मध्ये पुन्हा एकदा मोहन जोशीच ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं. Deool Band 2
View this post on Instagram
दरम्यान, मोहन जोशींव्यतिरिक्त कोणते कलाकार कुठल्या भूमिकेत असणार आहेत, हे अद्याप गुलदस्तात असल्याने ते जाणण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. हा सिनेमा 21 मे 2026 रोजी जगभरात रिलीज होणार असून अनेक जण या चित्रपटाची वाट पाहत आहेत.
या सिनेमाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केले आहे. पहिल्या भागातील कास्ट या नवीन सिनेमात पाहिला मिळणार का याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. Deool Band 2
पहिल्या भागात गश्मिर महाजनी, प्रविण तरडे, गरीजा जोशी, मोहन आगशे, मोहन जोशी आदी कलाकारांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना खेळवून ठेवली होते. या सिनेमाने अवघ्या चारच दिवसात आठ कोटींची कमाई केली होती. 2015 मध्ये सर्वाधिक काळ सिनेमागृहात चाललेला हा मराठी सिनेमा ठरला होता.
हेही वाचा :






