Sunetra Pawar : राज्यसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादीत खलबंत! सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा ‘हा’ नेता घेण्याची शक्यता
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

Sunetra Pawar : केंद्रीय निवडणूक आयोगाने १२ राज्यांतील २६ राज्यसभा जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचाही समावेश आहे.
खासदार सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यसभेचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत महायुतीचा उमेदवार विजयी होण्याची शक्यता संख्याबळाच्या आधारे मजबूत मानली जात आहे.
सुनेत्रा पवार या विधानसभा सदस्य आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या असल्याने त्यांच्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणाला संधी मिळणार याविषयी गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु झाली आहे. (Sunetra Pawar)

Sunetra Pawar : राज्यसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादीत खलबंत! सुनेत्रा पवारांची राज्यसभेची जागा ‘हा’ नेता घेण्याची शक्यता
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तीन नावांची राज्यसभेसाठी चर्चा आहे. पक्षात नावांबाबत खलबंत सुरू झाली आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार चर्चेतल्या नावांमधील एक नाव अंतिम करणार आहेत. मात्र, एकनाथ शिंदेंसारखा निर्णय घेऊन त्या सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतात. त्यामुळे त्या काय निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.
छगन भुजबळ यांचं नाव आघाडीवर (Sunetra Pawar)
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या १८ जून रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा असून त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली. या निवडणुकीची अधिसूचना १ जून रोजी जारी होणार असून, मतदान आणि मतमोजणी १८ जूनलाच पार पडणार आहे.
मोठा राजकीय पेच
भुजबळ यांनी यापूर्वी पक्षाकडे लोकसभा किंवा राज्यसभेवर पाठवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यास त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद द्यावे, अशी अट घातल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोर मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे.
दरम्यान, देशातील १० राज्यांमधील राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलैदरम्यान संपत आहे. राज्यसभेतील एकूण २४ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, दिग्विजय सिंह, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा यात समावेश आहे.





