Chikhali News : “पतिव्रता असल्याचे दाखवण्यासाठी महिला मोठं कुंकू अन्…”; काँग्रेसच्या माजी आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य
Chikhali News : माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या महिलांबाबत केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता

Chikhali News : ‘पतिव्रता असल्याचे दाखवण्यासाठी महिला मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते,’ असं वादग्रस्त वक्तव्य चिखलीचे माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केलं आहे.
राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्यादरम्यान राहुल बोंद्रे यांनी शनिवारी पत्रकार परिषद महिलांबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
‘तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करणार आहात का?’ या प्रश्नावर आपला स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली. ‘जी कुणी महिला असते, जीला दाखवावं लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते, असे राहुल बोंद्रे म्हणाले. राहुल बोंद्रे यांच्या या महिलांबाबत केलेल्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. Chikhali News
नेमकं काय म्हणाले माजी आमदार राहुल बोंद्रे ?
“भाजपवाल्यांची देशभरातील पॉलिसी आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करत राहायची, कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. त्यानुसार ते चर्चा करत राहतात. मी एकदाच सांगितलं आहे, परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही.
जी कोणी महिला असते. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते..” असे उदाहरण राहुल बोंद्रे यांनी दिले होते. तसेच देवीची यात्रा होती, यात्रेविषयी चर्चा झाली. याच्याविषयी काहीच नव्हतं, असेही त्यांनी गायकवाड यांच्यासोबतच्या भेटीबाबत म्हंटले. Chikhali News
महिलांचे ‘जोडे मारो आंदोलन’
चिखलीचे काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी महिला संबंधित केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्यातील महिलांकडून निषेध करण्यात येत आहे. चिखलीतील शिवाजी चौकात महिलांनी राहुल बोंद्रे यांच्या बॅनरला जोडे मारो आंदोलन केले.
हेही वाचा:






