Farmers Loan Waiver : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणविसांनी दिली अपडेट; ‘या’ तारखेआधी मिळणार मोठा दिलासा
Farmers Loan Waiver :

Farmers Loan Waiver : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक माहिती दिली आहे. येत्या ३० जूनपूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (१७ मे) पुण्यात केली.
राज्य सरकारची कर्जमाफी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून कॅबिनेट उपसमितीची बैठकही पार पडली आहे. काही जिल्ह्यांकडून अतिरिक्त तांत्रिक माहिती मागविण्यात आली असून ती प्राप्त होताच प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीची घोषणा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले आहे. पुण्यात आयोजित ‘पुणे ॲग्रो हॅकॅथॉन २०२६’च्या समारोप कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बोलत होते.
Pune Accident: शिवसेना ठाकरे गटातील नेत्याचा भीषण अपघात, रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू
यावेळी मुख्यमंत्री फडणविसांनी असेही सांगितले की, “काही जिल्ह्यांकडून शेतकऱ्यांची प्रलंबित माहिती मागवण्यात आली आहे. हा सर्व डेटा गोळा झाल्यानंतर ३० जूनपूर्वी कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाईल.
तसेच अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. या योजनेमध्ये केवळ थकबाकीदार शेतकरीच नव्हे, तर बँकेचे कर्ज वेळेत आणि नियमितपणे फेडणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांनाही ५०,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे,” असेही फडणविसांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. Farmers Loan Waiver
शेतकऱ्यांना दिलासा मिळेल – फडणवीस
तर कांद्याच्या घसरत्या दरांवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये कांद्याची निर्यात कमी झाली आहे. उत्पादन वाढले असताना मागणी घटल्याने बाजारभाव कमी झाले आहेत. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारने साडेबारा रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी सुरू केली असून त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Farmers Loan Waiver
हेही वाचा:
Hit and Run : खडकवासल्यात मद्यधुंद कारचालकाचा थरार; ४ वर्षांच्या निष्पाप बालकाचा मृत्यू






