Ramakant Dayama: ‘चक दे इंडिया’ फेम अभिनेते रमाकांत दयामा यांचे निधन; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत व्यक्त केलं दु :ख
Ramakant Dayama: अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रमाकांत दयामा यांच्या निधनाची बातमी दिली.

Ramakant Dayama: ज्येष्ठ अभिनेते रमाकांत दयामा यांचं आज 26 मे 2026 रोजी निधन झालं आहे. त्यांची सह-अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रमाकांत दयामा यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
शुभांगी लाटकर यांची भावुक पोस्ट (Ramakant Dayama)
शुभांगी यांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘आज आपण एक खूप सुंदर आत्मा गमावला आहे, मी निःशब्द झाले. रमाकांत दयामा केवळ माझे चांगले मित्र आणि कौटुंबिक मित्रच नव्हते, तर मी कायम त्यांचं कौतुक करायचे आणि आदर करायचे.
आव्हानात्मक आयुष्यातही जगण्याचा खरा आनंद कसा घ्यायचा हे त्यांना माहित होतं. एक डान्सर, एक गायक, एक उत्तम अभिनेते आणि माझ्यासाठी मार्गदर्शक असे ते होते.’
View this post on Instagram
‘ते उंचीने कमी असले तरी, माझ्या ओळखीमध्ये सर्वात धाडसी व्यक्तींपैकी एक होते. ते अनेक महिन्यांपासून आजारी होते हे आम्हा सर्वांना माहीत होतं, तरीही आमच्या मनात आशा कायम होती. आमची अनेक स्वप्न अपूर्ण राहिली. अनेक वर्षांनंतर, मला त्यांच्यासोबत पुन्हा काम करायचं होतं.’ Ramakant Dayama
‘आम्ही एकत्र एक सुंदर हिंदी नाटक करायचं ठरवलं होतं. जेव्हा मी त्यांना विनंती केली, तेव्हा ते हसले आणि म्हणाले, ‘मला लवकर बरं होऊ दे.’ आम्ही रंगमंचावर एकत्र काही सुंदर कविता सादर करण्याची योजनाही आखली होती. ते स्वप्नही अपूर्ण राहिलं.
‘काही गोष्टी गमावल्यानंतर मनात एक अशी शांतता पसरते, जी शब्दांत व्यक्त करता येत नाही. आजचा दिवस तसाच काहीसा आहे. रमाकांतजी, आम्हाला तुमची खूप उणीव जाणवेल. तुमचं प्रेम, तुमचं धैर्य, तुमची कला आणि तुमचा सुंदर आत्मा आमच्या हृदयात सदैव जिवंत राहील. तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे म्हणत शुभांगी यांनी शोक व्यक्त केला आहे. Ramakant Dayama
रमाकांत यांनी ‘चक दे इंडिया’, ‘राम सेतू’, ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ आणि ‘ब्रदर्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाचे अनेकांकडून कौतुक होत असे. मात्र त्यांच्या जाण्याने बॉलीवूड विश्वावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा:
Watermelon or Muskmelon: उन्हाळ्यात टरबूज की खरबूज? जाणून घ्या कोणतं फळ आरोग्यासाठी जास्त फायदेशीर





